राज्यसेवा पूर्वपरीक्षा – इतिहास घटक सराव
१)‘राजतरंगिणी’ हा संस्कृत भाषेतील ग्रंथ काश्मीरचा इतिहास समजून घेण्यास उपयोगी पडतो. या ग्रंथाचे लेखक खालीलपकी कोण आहेत?
१) कल्हण २) राजशेखर
३) क्षेमेंद्र ४) बिल्हण
२) खालील विधाने वाचून त्याखालील पर्याय निवडा
अ) जैन धर्मात तीर्थ म्हणजे गणांचा संघ.
ब) महावीराला शाल वृक्षाखाली केवल ज्ञान प्राप्त झाले.
क) जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर ऋषभदेव होय.
ड) जैन धर्मात एकूण २२ तीर्थकर झाले.
१) अ आणि ब बरोबर
२) अ, ब, क बरोबर
३) वरीलपकी सर्व विधाने बरोबर
४) फक्त क बरोबर
३) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी २१ ऑक्टोबर १०४३ रोजी सिंगापूर येथे स्थापन केलेल्या पहिल्या भारतीय सरकार – आझाद हिंद सरकार- मधील पदाधिकारी व त्यांची पदे/
विभाग यांच्या जोडय़ा पुढे दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती?
१) नेताजी सुभाषचंद्र बोस – राष्ट्रपती
२) एस. सी. चटर्जी – वित्त विभाग
३) रासबिहारी बोस – सेनादलांचे अध्यक्ष
४) एस. ए. अय्यर – प्रचार विभाग
४) गट अ (मराठा सत्ता) व गट ब (ईस्ट इंडिया कंपनीबरोबर झालेल्या तहाचे स्थान) यांच्या योग्य जोडय़ा जुळवा.
गट अ गट ब
अ) पेशवा १) वसई
इ) होळकर २) राजघाट
उ) भोसले ३) देवगाव
ऊ) शिंदे (सिंदिया ) ४) सुर्जी अंजनगाव
पर्याय
१) अ-३, इ-४, उ-२, ऊ -१
२) अ-२, इ-१, उ-३, ऊ -४
३) अ-४, इ-२, उ-३, ऊ -१
४) अ-१, इ-२, उ-३, ऊ -४
५) खालील विधाने वाचा
अ) याच्या कारकीर्दीत विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.
ब) याचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते.
वरील वर्णन कोणत्या राजासंबंधी आहे?
१) राजा रामदेवराय
२) राजा कृष्णदेवराय
३) बुक्का प्रथम ४) टीपू सुलतान
६) महात्मा गांधीजींबाबत खालील विधाने वाचा.
अ) सन १८९६ मध्ये आफ्रिकेत काँग्रेसची स्थापना केली.
ब) सन १९१५ मध्ये अहमदाबादमधील जीवनलाल यांचे घर भाडय़ाने घेऊन सत्याग्रहाश्रमाची स्थापना केली.
क) सन १९१९ मध्ये आयोजित अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे ते अध्यक्ष होते.
वरीलपकी अयोग्य विधाने कोणती?
१) क सोडून सर्व
२) ब सोडून सर्व
३) अ सोडून सर्व
४) कोणतेही नाही
७) खालील विधाने वाचा-
अ) हैद्राबाद राज्याची राजभाषा फारसी होती.
ब) १९१९ मध्ये हैद्राबादमध्ये उस्मानिया विद्यापीठ स्थापन झाले.
क) १९२७ मध्ये औरंगाबादमध्ये इंटरमिजियट कॉलेज स्थापन झाले.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१) अ आणि ब बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) ब आणि क बरोबर
४) अ आणि क बरोबर
८) केंद्रीय वित्त मंत्रालयाने पुढीलपकी कोणत्या प्रसंगी रु. ७५ किमतीचे नाणे प्रकाशित केले आहे?
अ) आझाद हिंद सेनेच्या सनिकांची लाल किल्ल्यामध्ये झालेल्या खटल्यामध्ये सुटका झाल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त.
ब) आझाद हिंद सेनेच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवानिमित्त.
क) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे स्वतंत्र भारताचा झेंडा पहिल्यांदा फडकविल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त.
ड) सिंगापूर येथे स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारला जर्मनी सरकारची मान्यता मिळाल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त.
उत्तरे व स्पष्टीकरणे
१. योग्य पर्याय (१). कल्हण हा बाराव्या शतकातील काश्मिरी इतिहासकार होता.
२. योग्य पर्याय (१). जैन धर्मात एकूण २४ तीर्थकर झाले. त्यातील शेवटचे तीर्थकर महावीर होय.
३. योग्य पर्याय (३). (रासबिहारी बोस हे सेनादलांचे अध्यक्ष नव्हते. आझाद हिंद सरकारमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, तिन्ही सेनादलांचे अधिपती नेताजी सुभाषचंद्र बोस हेच होते. ५ जुल १९४३ रोजीच नेताजी आझाद हिंद सेनेचे प्रमुख बनले व सिंगापूरच्या टाऊन हॉलमधून सेनाप्रमुख या नात्याने त्यांनी आझाद हिंद सेनेला संबोधित करताना ‘चलो दिल्ली’ अशी घोषणा दिली. आझाद हिंद सरकारला जर्मनी, जपान, फिलिपाइन्स, कोरिया, चीन, इटली, मान्चुको व आर्यलड या देशांनी मान्यता दिली.)
४. योग्य पर्याय (४).
५. योग्य पर्याय (२). राजा कृष्णदेवराय हा इ.स.१५०९ साली विजयनगरच्या गादीवर बसला. विजयनगर राज्याच्या इतिहासातील हा सर्वात कर्तबगार राजा होता.
६. योग्य पर्याय(२). (गांधीजींनी सन १८९४ मध्ये आफ्रिकेत काँग्रेसची स्थापना केली. खिलाफत परिषदेमध्ये त्यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.)
७. योग्य पर्याय(४). (उस्मानिया विद्यापीठ १९१७ मध्ये स्थापन झाले.)
८. योग्य पर्याय (क).
– रोहिणी शहा
सदर लेख हा दैनिक लोकसत्तामधील आहे