⁠  ⁠

आधुनिक भारताचा इतिहास (१) – Bits

Rajat Bhole
By Rajat Bhole 5 Min Read
5 Min Read

डॉ. जी. आर. पाटील
१) खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) फ्रेंचांनी भारतात अनेक ठिकाणी वखारी सुरू केल्या. त्यापकी सर्वात महत्त्वाची वखार मुंबई येथे होती.
२) इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी निरनिराळय़ा वखारी सुरू केल्या होत्या, त्यापकी सर्वात महत्त्वाची पुदुच्चेरी ही होती.

१) १ व २ बरोबर
२) फक्त २ बरोबर
३) फक्त १
४) १ व २ चूक

स्पष्टीकरण- फ्रेंचांनी सुरू केलेल्या वखारींमध्ये कारीकल, पुदुच्चेरी व चंद्रनगर येथील वखारींचा समावेश होता. त्यात मुंबई येथे वखार नव्हती. इंग्रजांनी आपल्या वखारी मुंबई, सुरत व चेन्नई येथे सुरू केल्या. पुदुच्चेरी येथे त्यांच्या वसाहती नव्हत्या.

२) खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी १८२९ मध्ये सतीच्या चालीस कायद्याने बंदी घातली.
२) १८३५ मध्ये सर चार्ल्स मेटकॉफ या गव्हर्नर जनरलने १८३५ मध्ये वृत्तपत्र कायदा संमत करून भारतात वृत्तांवर असलेले र्निबध दूर केले.
३) लॉर्ड कॉर्नवॉलिस याने आपले सहकारी सर जॉन शोअर व जेम्स ग्रँड यांच्या मदतीने कायमधारा पद्धतीची योजना तयार केली.
४) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात रयतवारी व महलवारी या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधणारी नवीन जमीन महसूल पद्धत सुरू केली.

१) १ व २ बरोबर
२) २ व ३ बरोबर
३) फक्त १
४) सर्व बरोबर

३) खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) इंग्रजांनी अयोध्येचा नवाब वजीद अली शाह यांस तुरुंगात डांबल्यामुळे तेथील प्रजा इंग्रजांच्या विरुद्ध खवळली व त्यांनी बेगम हजरत महल यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला.
२) १८५७च्या उठावात हैदराबाद, ग्वाल्हेर व बडोदा येथील संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेत.
३) ११ मे १८५७ रोजी िहदी शिपायांनी जेव्हा दिल्ली ताब्यात घेतली तेव्हा दिल्लीचा कमिशनर निकोलसन हा होता.
४) १८ एप्रिल १९५९ रोजी १८५७च्या उठावात सहभागी झाल्यानंतर इंग्रज सरकारने नानासाहेब यांना क्षिप्री येथे १८ एप्रिल १८५९ रोजी जाहीररीत्या फाशी दिली.

१) १ व २ बरोबर
२) २ व ३ बरोबर
३) १, २ व ३ बरोबर
४) सर्व बरोबर

स्पष्टीकरण– * ११ मे १८५७ रोजी हिंदी शिपायांनी जेव्हा दिल्ली ताब्यात घेतली तेव्हा दिल्लीचा कमिशनर सायमन फ्रेझर हा होता. * १८ एप्रिल १९५९ रोजी १८५७च्या उठावात सहभागी झाल्यानंतर इंग्रज सरकारने तात्यासाहेब टोपे यांना क्षिप्री येथे जाहीररीत्या फाशी दिली.

४) खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
१) बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना लॉर्ड कर्झन यांची होती.
२) स्वामी दयानंद सरस्वती यांनी ७ एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली.
३) लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय यांचा समावेश आर्य समाजाच्या अनुयायांमध्ये करता येईल.
४) १८८० मध्ये केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात फूट पडल्यानंतर नवविधान सभा या संघटनेची स्थापना केली.

१) फक्त १ चूक
२) २ व ३ चूक
३) १, २ व ३ चूक
४) सर्व चूक

५) खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी महात्मा गांधींची उपस्थिती ही महत्त्वाची घटना होती.
२) नेहरू रिपोर्ट १९२८ मध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आली.
३) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा समावेश राष्ट्रसभेच्या जहाल नेत्यांमध्ये केला जाऊ शकतो.
४) अरिवद घोष यांचा समावेश राष्ट्रसभेतील मवाळांचे पुढारी म्हणून करता येईल.
स्पष्टीकरण- १) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी महात्मा गांधीजी उपस्थित नव्हते. ३) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा समावेश राष्ट्रसभेच्या मवाळमतवादी गटात केला जातो. ४) अरिवद घोष यांचा समावेश राष्ट्रसभेतील जहालमतवादी नेत्यांमध्ये केला जातो.

६) खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१) ३० डिसेंबर १९०६ रोजी ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना केली गेली. मुस्लिम लीगचे संस्थापक म्हणून बॅ. मोहम्मद जीना यांचा समावेश करता येईल.
२) १ ऑगस्ट १९२० रोजी गांधींच्या नेतृत्वाखाली असहकाराचे आंदोलन सुरू करण्यात आले, तसेच सप्टेंबर १९२० मध्ये कोलकत्ता येथे खास अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा कार्यक्रम स्वीकारला. या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते.

१) फक्त १ बरोबर
२) फक्त २ बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चूक
स्पष्टीकरण- १) मुस्लिम लीगचे संस्थापक म्हणून नवाब सलीम उल्ला यांचा समावेश केला जातो. २) या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय हे होते.

(सदर लेख डॉ. जी. आर. पाटील यांनी दैनिक लोकसत्ताच्या करिअर वृत्तान्त या सदरात लिहला आहे. दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावर आधी प्रसिध्द झाला आहे. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला [email protected] या मेल पाठवू शकता.)

TAGGED: ,
Share This Article