Become a Guest Writer

mpsc-guest-writer

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

मागील काही वर्षातील आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास केवळ पुस्तकी अभ्यास करण्याचे दिवस आता संपले असल्याचे आपल्या लक्षात येईल. संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करून संकल्पना समजून घेणे आता गरजेचे झाले आहे. ‘ग्रुप डिस्कशन’ स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याचे सर्वाना माहित आहे. याच धर्तीवर आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘गेस्ट राईटर’ हि नवीन संकल्पना सुरु करत आहोत.

समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतःचा स्वतः करता आला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले वाचन, लेखन, शंकांचे निरसन करून घेणे, नोट्स काढणे, विषयाची पोपटपंची न करता तो समजण्यावर भर देणे, समजलेला विषय स्वतःच्या नेमक्या शब्दांमध्ये मांडता येणे ही सगळी स्वाध्याय कौशल्ये आहेत. ती सुधारण्यासाठी तसेच एकूणच व्यक्तिमत्व विकसनासाठी ‘गेस्ट राईटर’ ही सुविधा खूप उपयोगी पडेल यात शंकाच नाही.

सामाजिक, संस्कृतिक, विज्ञान, आर्थशास्त्र, इतिहास, चालू घडामोडी, राजकारण यांसारख्या कोणत्याही विषयावरील (Anything Under the Sun) लेखांचे स्वागत आहे. तुमचा लेख मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत असावा. शक्य झाल्यास युनिकोड फॉन्टमध्ये टाईप करून पाठवा. युनिकोड टाईपिंग करण्यासाठी पुढील लिंकची मदत घ्यावी

Google Marathi Typing

लेख हे कमीत कमी ५०० शब्दांचे असावेत. लेख तुम्ही लिहलेले असावेत इतर वेबसाइट वरील कॉपी-पेस्ट केलेले नसावे. तुमचे लेख [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावे. लेख तपासण्याचा, सुधारण्याचा तसेच प्रकाशित करण्याचे सर्व हक्क ‘Mission MPSC’ कडे असतील. पुढील माहिती आपणास ईमेल द्वारे कळवण्यात येईल. आपल्या शंका खालील कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा.

Comments 2

  1. madhusudan says:

    i want to be a guest writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.