Current Affairs : 09 February 2021
ऋषभ पंत झाला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ

भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आयसीसी प्लेअर आॅफ द मंथ पुरस्कार दिला आहे.
महिला क्रिकेटपटूंमध्ये द. आफ्रिकेची शबनिम इस्माइल हिला हा पुरस्कार मिळाला आहे.
आयसीसीने पहिल्यांदाच या पुरस्काराची घोषणा केली आहे.
डीजी रश्मी शुक्ला बनणार सीआरपीएफच्या एडीजी

नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अप्पर महासंचालक म्हणून केंद्रीय गृह विभागाने त्यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत.
रश्मी शुक्ला या १९८८च्या आयपीएस बँचच्या अधिकारी आहेत
सुपर बाॅल : टाॅम ब्रेडी सर्वाधिक सातवे विजेतेपद जिंकणारा एकमेव

मेरिकन फुटबाॅल टीम तंपा बे बुकानियर्सने देशातील सर्वात माेठी स्पर्धा सुपर बाॅलचा किताब पटकावला.
बुकानियर्स संघाने कंसास सिटी चिफ्सचा ३१-९ ने पराभव केला.
संघातील टाॅम ब्रेडी हा सर्वाधिक सात वेळा किताब जिंकणारा खेळाडू ठरला.
हे यश संपादन करणारा ताे जगात पहिला फुटबाॅलपटू ठरला.
त्याने करिअरमध्ये २० वर्ष न्यू इंग्लंड पेट्रियट्सचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या उपस्थितीत हा संघ सहा वेळा किताबाचा मानकरी ठरला.
४३ वर्षे १८८ दिवसांचा ब्रेडी हा सुपर बाॅल खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला