Current Affairs : 09 January 2021
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
संमेलन २०२०-२१ मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या निश्चित तारखा नाशिकमध्ये २३ आणि २४ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून जाहीर करण्यात येतील. ही ठाले पाटील म्हणाले.
सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्वीकारला CISF प्रमुखपदाचा कार्यभार

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.
महाराष्ट्राचे माजी पोलीस प्रमुख असणारे जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्राच्या सेवेत दाखल झाले आहेत.
जयस्वाल आता 1 लाख 62 हजार जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या सीआयएसएफचे नेतृत्व करणार आहेत.
सीआयएसएफवर देशातील विमानतळांबरोबरच अवकाश आणि आण्विक संस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
त्या दलाच्या महासंचालकपदी कार्यरत राहण्याची संधी जयस्वाल यांना सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीसाठी मिळेल.
ते सप्टेंबर 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
जयस्वाल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) 1985 च्या तुकडीमधील अधिकारी आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) ते घटक होते.
त्याशिवाय, रॉ या गुप्तचर संस्थेतील कार्याचा अनुभवही त्यांच्या गाठिशी आहे.
‘शिवालिक’ला स्मॉल फायनान्स बँक म्हणून तत्त्वत: परवाना

सहकार क्षेत्रातील शिवालिक मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला खासगीकरणाचा मार्ग अनुसरून, ‘स्मॉल फायनान्स बँक’ म्हणून कार्य करण्याला रिझव्र्ह बँकेने तत्त्वत: मंजुरी दिली. ऐच्छिक संक्रमण योजनेंतर्गत सहकारातून खासगीकरण असे परिवर्तन होत असलेली ही पहिलीच नागरी सहकारी बँक आहे.
उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी बहुराज्यात विस्तार असलेली नागरी सहकारी बँक असलेल्या शिवालिकने सर्वप्रथम आर. गांधी समितीच्या शिफारशींनुसार, स्मॉल बँक परवाना मिळविण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे अर्ज दाखल केला होता.
आता रिझव्र्ह बँकेकडून तत्त्वत: मंजुरी म्हणजे खासगीकरणाकडील संक्रमणाच्या अंतिम टप्प्यात तिने प्रवेश केल्याचेच द्योतक आहे.
तत्त्वत: मंजुरीचा एक भाग म्हणून आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शिवालिकला १८ महिन्यांचा कालावधी दिला जाईल. पण बँक अपेक्षेपेक्षा लवकर या बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि एप्रिल २०२१ च्या पूर्वीच स्मॉल फायनान्स बँक म्हणून बँक व्यवसाय सुरू करेल, असा विश्वास शिवालिक मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुवीर कुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.
शिवालिकचा ३१ मार्च २०२० अखेर एकूण व्यवसाय १,८०० कोटी रुपयांचा आहे. तर सध्या कार्यरत १,५०० नागरी सहकारी बँकांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक स्वनिधी असलेल्या बँकांची संख्या साधारण ९०० इतकी आहे. शिवालिकपाठोपाठ मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेनेही ‘स्मॉल फायनान्स बँक’ बनण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.