Current Affairs : 13 February 2021
किरकोळ महागाईचा दर कमी हाेऊन ४.०६ टक्के

भाज्यांचे भाव कमी झाल्याने देशात किरकोळ महागाईचा दर कमी झाला आहे.
जानेवारीमध्ये हा दर ४.०६ टक्के नोंदला गेला. गेल्या महिन्यात तो ४.५९ टक्के होता. सप्टेंबर २०१९ नंतरच्या कालावधीतील हा सर्वात कमी दर आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईचा दर यंदा दोन टक्क्यांची घट किंवा वाढ अशा अंदाजाने ४ टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तवला आहे. आकडेवारीनुसार भाज्यांचे भाव वार्षिक तुलनेत १५.८४ टक्क्यांनी कमी झाले. याशिवाय इतर वस्तूंच्या महागाई दरातही ६.६० वरून ६.४९ टक्के घसरण झाली आहे. दरम्यान, पान, तंबाखू, गृह, इंधन, वीज, वस्त्र, पादत्राणे यांच्या किमतीमध्ये या काळात किंचित वाढ झाली आहे.
२०२० मध्ये जानेवारीत तो ५.५९%, फेब्रुवारीत ६.५८, मार्चमध्ये ५.८४, एप्रिलमध्ये ७.२२, मेमध्ये ४.२६, जूनमध्ये ६.२३, जुलैमध्ये ६.७३, ऑगस्टमध्ये ६.६९, सप्टेंबरमध्ये ७.२७, ऑक्टोबरमध्ये ७.६१, नोव्हेंबरमध्ये ६.९३% होता. डिसेंबरमध्ये तो ४.५९% वर आला.
ग्रामीण-शहरी दोन्ही भागांत दर झाला कमी :किरकोळ महागाईच्या दराचा शहरी आणि ग्रामीण असा विचार करता दोन्ही भागांत तो कमी झाला आहे. शहरात हा दर ५.१९ वरून ५.०६ तर ग्रामीण भागांत डिसेंबर-२० पर्यंत ४.०७च्या तुलनेत कमी होऊन ३.२३ टक्के झाला.
ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष मोरी यांचा राजीनामा

टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी पदाचा राजीनामा दिला.
टोक्यो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मोरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या वारसदाराची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर कडाडून टीका होत होती. सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार देत त्यांनी सर्वाची माफी मागितली होती. पण पुरस्कर्ते, दूरचित्रवाणीवरून सातत्याने दबाव येऊ लागल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
धडगावच्या रिंकी पावराने राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
गुवाहाटी येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत खर्डी (ता.धडगाव) येथील रिंकी पावरा हीने धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. मुलींच्या १८ वर्ष आतील गटात तिने हे यश मिळवलेे.
दहावीत असताना आसाम येथील गुवाहाटी येथे झालेला फिट इंडिया स्पर्धेत कास्य पदक मिळवले होते.
खर्डी या छोट्या गावात राहणाऱ्या रिंकूने तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक पटकावले होते.
तीने पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
कुशल कामगारांच्या प्रशिक्षणाबाबत जपानबरोबर सामंजस्य करार

भारत आणि जपान सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये विशिष्ट कुशल कामगार संबंधित सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.
या मंत्रालयाच्या अंतर्गत सुश्रुषा सेवा, इमारत स्वच्छता, साहित्य प्रक्रिया उद्योग; औद्योगिक यंत्रणा उत्पादन उद्योग, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माहितीशी संबंधित उद्योग, बांधकाम, जहाज बांधणी आणि जहाज-संबंधित उद्योग, वाहन देखभाल, विमान वाहतूक, लॉजिंग, शेती, मत्स्योद्योग, अन्न आणि शीतपेय उत्पादन उद्योग आणि अन्न सेवा उद्योग आदी चौदा क्षेत्रातील कुशल भारतीय कामगारांची जपानमध्ये नोकरीच्या संधीं उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
तांत्रिक इंटर्न प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जपान सरकार भारतातून जपानमध्ये उमेदवारांना आमंत्रित करत एमएसडीई आणि जपानच्या न्याय मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयांने 2017 च्या ऑक्टोबरमध्ये सहकार्य करारावर स्वाक्षरी केली होती.
कौशल्य विकास क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय सहकार्यात लक्षणीय वाढ करण्याच्या उद्देशाने या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.