⁠  ⁠

चालू घडामोडी : १६ मार्च २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

अन्नू राणीचा नवा राष्ट्रीय विक्रमannu rani

अन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.
राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. सविता पाल हिने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले.
किरण बलियान याने गोळाफेक प्रकारात १६.४५ मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. तामिळनाडूच्या रॉसी पौलराजने पोलव्हॉल्ट प्रकारात ३.८० मीटर इतकी कामगिरी नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली.

महागाईचा दर ४.१७ टक्क्यांवरWholesale inflation: घाऊक महागाईचा दर ३.८० टक्क्यांवर - wholesale inflation falls to eight month low of 3.80% | Maharashtra Times

घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) वर आधारित महागाई मागील महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात वाढून ४.१७ टक्क्यांवर गेली आहे, असे उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने सांगितले.
मागील वर्षाच्या याच महिन्यात ती २.२६ टक्के होती आणि मागील महिन्याच्या जानेवारी २०२१ मध्ये ते २.२३ टक्क्यांवर पोहचली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये घाऊक किमती मागील २७ महिन्यांत सर्वाधिक होती.
खाद्यपदार्थ व उत्पादित वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे हे घडले आहे. फेब्रुवारी महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये १.३६ टक्क्यांनी वाढ झाली. यापूर्वी जानेवारीत २.८० टक्के घसरण झाली होती.
भाजीपाल्याच्या किमती फेब्रुवारीत २.९० टक्क्यांनी घसरल्या, जानेवारीत त्यांच्या किंमती २०.८२ टक्क्यांनी घसरल्या. जर आपण डाळींबद्दल चर्चा केली तर फेब्रुवारीमध्ये डाळींच्या किंमती १०.२५ टक्के वाढल्या. त्याच वेळी फळांच्या किंमती ९.४८ टक्के आणि पॉवर ग्रुप चलनवाढीचा दर ०.५८ टक्के होता.
मागील महिन्याच्या तुलनेत डब्ल्यूपीआय निर्देशांकात तात्पुरते खाद्यपदार्थ आणि उत्पादित उत्पादने अनुक्रमे ३.३१ आणि ५.८१ टक्के वाढली आहेत.
फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्व खाद्यपदार्थांमध्ये कांदा, डाळी, फळे आणि दुधाच्या किंमती अनुक्रमे ३१.२८ टक्के, १०.२५ टक्के, ९.४८ टक्के आणि ३.२१ टक्के वाढल्या. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात चलनविषयक धोरण जाहीर केले. दर बदल न करता हे सलग चौथे पुनरावलोकन होते. दुसरीकडे किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ५.०३ टक्के होती.

पोलीस दलातील सुभाष पुजारी ठरले ‘महाराष्ट्र मास्टर श्री’Honor! Subhash Pujari who is in police department becomes 'Maharashtra Master Shri' | सन्मानाचा तुरा! पोलीस दलातील सुभाष पुजारी ठरले 'महाराष्ट्र मास्टर श्री'

“मास्टर महाराष्ट्र श्री २०२१ या शरीरसौप्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाकडून खेळताना ८० किलो वजनी गटामध्ये महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावत एक नव्या यशाला गवसणी घातली आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये मेडल मिळविणारे सुभाष पुजारी हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आधिकारी आहेत. आपली नोकरी संभाळून दिवसातून किमान 5 तास व्यायाम करणारे पुजारी हे खऱ्या अर्थाने तरुणांना प्रेरणा देणारे अधिकारी ठरले आहेत.
या कामगिरीमुळे पुजारी यांची २० व २१ मार्च रोजी लुधियाना पंजाब या ठिकाणी होणा-या मास्टर भारत श्री २०२१” या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आलेली आहे.

Share This Article