Current Affairs 19 December 2019
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार

- ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- साहित्य अकादमीने २०१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा बुधवारी केली. त्यात २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. सात कवितासंग्र, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. यात मराठीतून अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार घोषित करण्यात आला. गेल्या ४५ वर्षांपासून अनुराधा पाटील निष्ठेने आणि चिंतनपूर्णतेने काव्यलेखन करीत आहेत. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘मटा’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, ‘या पुरस्काराने आनंद झाला आहे. आजवर निष्ठेने लिहित आलेल्या कवितेचा तो सन्मान आहे.
- ’या भाषेतील साहित्यकारांना पुरस्कार जाहीर
- असमिया – जय श्री गोस्वामी महंत
- बाड्ला – चिन्मय गुहा
- बोडो – फुकन चन्द्र
- डोगरी – ओम शर्मा
- गुजराती- रतिलाल बोरीसागर
- कन्नड़ – विजया
- कश्मीरी- अब्दुल अहद हाज़िनी
- कोंकणी – निलबा खांडेकर
- मैथिली – कुमार मनीष
- मलयालम- मधुसूदन नायर
- मणिपुरी – बेरिल
- मराठी- अनुराधा पाटील
- ओड़िया – तरूण कांति
- पंजाबी – किरपाल कज़ाक
- राजस्थानी- रामस्वरूप किसान
- संस्कृत – पेन्ना मधुसूदन
- संताली – काली चरण
- सिंधी – ईश्वर मूरजाणी
- तमिल- धर्मन
- तेलुगु – बंदि नारायणा स्वामी
सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शमी अव्वल, ट्रेंट बोल्टला टाकलं मागे

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसाठी यंदाचं वर्ष हे अतिशय चांगलं जाताना दिसत आहे. २०१९ विश्वचषक, त्यानंतर घरच्या मैदानावरील कसोटी मालिकांमध्ये शमीने आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवली. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात मोहम्मद शमीने २०१९ वर्षातला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला आहे.
विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. यासोबत शमीच्या खात्यात ४१ बळी जमा झाले असून भारताला आणखी एक सामना खेळायचा आहे. या सामन्यात शमीला आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याची संधी आहे. यावेळी शमीने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकलं, बोल्टच्या नावावर सध्या ३८ बळी जमा आहेत.
२०१९ वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारे गोलंदाज –
१) मोहम्मद शमी – ४१ बळी
२) ट्रेंट बोल्ट – ३८ बळी
३) लॉकी फर्ग्यसन – ३५ बळी
४) मुस्तफिजुर रेहमान – ३४ बळी
५) भुवनेश्वर कुमार – ३३ बळी
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २५ वर्षांत पहिल्यांदा महिलेने पुरुषाला हरवले

जागतिक डार्ट चॅम्पियनशिपमध्ये २५ वर्षांत पहिल्यांदा कोणत्या महिलेने पुरुष खेळाडूला हरवले. लंडनमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी इंग्लंडच्या २५ वर्षीय फेलोन शेरोकने आपल्याच देशाच्या टेड इवेट्सला ३-२ ने हरवले. डार्ट चॅम्पियनिशप १९९४ पासून हाेत आहे. २००० मध्ये पहिल्यांदा स्पर्धेत महिला खेळाडूंना सहभागी करुन घेण्यात आले.
रोहित एका वर्षात ७ देशांविरुद्ध शतके ठोकणारा पहिला फलंदाज बनला

रोहित शर्मा याने वेस्ट इंडीजविरुद्ध १३८ चेंडूंमध्ये १५९ धावा ठोकल्या त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडीजविरुद्ध शतके झळकावली. सोबत २०१९ मध्ये तिन्ही प्रकारांत मिळून त्याची एकूण १० शतके पूर्ण झाली. एका वर्षात १० आंतरराष्ट्रीय शतके करणारा तो पहिला सलामीवीर फलंदाज बनला. अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा फलंदाज आहे.
रोहितने वनडेमध्ये आठव्यांदा १५० पेक्षा अधिक धावा काढल्या. तो काेणत्याही एका टीमविरुद्ध ३ वेळा १५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला खेळाडू बनला. रोहितने वनडेत ८ वेळा १५० +धावा केल्या. हादेखील विश्वविक्रम आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर असून त्याने ६ वेळा अशी कामगिरी केली.
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या असणार
आंध्र प्रदेशात आता तीन राजधान्या असणार आहेत. याबाबतची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत केली. आता आंध्र प्रदेशातील राजधान्यांमध्ये करनूल, विशाखापट्टनम आणि अमरावतीचा समावेश आहे. सध्या हैदराबाद हीच सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. परंतु आता आंध्र प्रदेशने स्वतःची वेगळी राजधानी निर्माण करण्याचे म्हटले आहे.
आंध्र प्रदेश राज्याच्या तीन राजधान्या असतील. या वेगवेगळ्या राजधान्यामधून सरकार, विधानसभा आणि न्याय प्रक्रियेचे कामकाज केले जाणार आहे. म्हणजेच विशाखापट्टनम् आंध्रप्रदेशची प्रशासकीय कार्यकारी (executive) राजधानी असणार आहे. करनूलला न्यायिक (judicial) राजधानी म्हणून ओळख मिळणार आहे. तर, अमरावती विधिमंडळ (lagislative ) राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे.