Current Affairs : 22 February 2021
ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोवीचचे 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद

सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने नववे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसचे विजेतेपद पटकावताना कारकिर्दीतील 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदही साजरे केले.
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोवीचने रशियाच्या डॅनियल मेदवेदेववर 7-5, 6-2, 6-2 असा सलघ तीन सेटमध्ये विजय मिळवला व अपेक्षेप्रमाणे विजेतेपदही पटकावले.
या विजेतेपदसाच्या जोरावर तो जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहिला असून सलग 311 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने रॉजर फेडररला मागे टाकत ही कामगिरी केली.
बीकानेरमध्ये 16 वे भारत-अमेरिका संयुक्त सैन्य सराव

राजस्थानमधील बीकानेरमध्ये भारत-अमेरिका सैन्य यांच्यामध्ये 16 व्या संयुक्त युद्धाभ्यास सुरू अाहे.
आशियातील सर्वात मोठी फिल्ड फायरिंग रेंज बीकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये भारत-अमेरिकन सैन्यांदरम्यान संयुक्त युद्धावस्था सुरू आहे, जो येथे 15 दिवस चालणार आहे.
या कालावधीत दोन्ही देशांच्या सैनिकांनी ५४ तासांचा ‘व्हॅलिडेशन’ सराव केला.
दशकाहून अधिक काळ अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांना नागरिकत्व

नवे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजाराे भारतीय व्यावसायिकांना लाभ हाेणार आहे.
राेजगारावर आधारित देशनिहाय ग्रीन कार्डधारकांची मर्यादा रद्द करण्याचे या विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे.
अमेरिकेत दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरूपी नागरिकत्व हा कायदा मंजूर झाल्यास मिळणार आहे.
आयटी क्षेत्रात भारतातून हजाराे जण अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा लाभ मिळेल. विविध प्रकारच्या व्हिसांची संख्याही ८० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
हैदराबादला ‘2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड’ म्हणून मान्यता

द आर्बर डे फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) हैदराबादला ‘2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड’ म्हणून मान्यता दिली आहे.
शहरी वनांच्या संवर्धनासाठी शहराच्या बांधिलकी लक्षात घेता ही मान्यता देण्यात आली आहे.
असा दर्जा मिळविणारे हैदराबाद हे देशातील एकमेव शहर आहे.
या सूचीमध्ये समाविष्ठ सर्वाधिक शहरे अनुक्रमे यूएसए, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांची आहेत.
अन्न व कृषी संघटना (FAO)
स्थापना आणि उद्देश – संयुक्त राष्ट्रसंघाची ही सर्वात मोठी विशेष एजन्सी आहे, जी ग्रामीण लोकसंख्येचे पोषण आणि जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये स्थापन केली गेली.
• मुख्यालय – रोम, इटली.
• सभासद – 197