Current Affairs : 25 December 2020
टेबल टेनिसच्या १४ वर्षीय खेळाडूचा गिनीज विक्रम

महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील १४ वर्षीय पी. हरिकृष्णा याने टेबल टेनिसमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
त्याने १ ऑक्टोबरला टेबल टेनिस पॅडलचा वापर करत एका तासात सर्वाधिक ९५१२ ‘अल्टरनेट हिट’ केले.
त्यासोबत त्याने १००० हिट्स जास्त करून मागील विक्रमही मोडीत काढला आहे.
सिडनीतील राेषणाई बघणाऱ्या पेंग्विनच्या चित्राला मिळाला ओशियन पुरस्कार

ऑस्ट्रेलियामध्ये एकमेकांचे सांत्वन करत असलेल्या या दोन ‘पेंग्विन’च्या छायाचित्राला ओशियानोग्राफिक मासिकाचा ओशियन फोटोग्राफ पुरस्कार मिळाला आहे.
हे छायाचित्र मेलबर्नमधील जर्मन फोटोग्राफर टोबियस बामगार्टनर यांनी काढले हाेते.
टोबियस यांनी सांगितले की, हे एकमेकांचे सांत्वन करताना तरुण नर आणि वृद्ध मादीचे छायाचित्र अाहे. त्यांच्या साथीदाराचा अलीकडेच मृत्यू झाला. याअाधी कम्युनिटी चाॅइस पुरस्कारासाठीही या छायाचित्राची निवड झाली हाेती.
निवड समितीचं अध्यक्षपद चेतन शर्मा यांच्याकडे :
भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत.
तर अबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या मराठमोळ्या अजित आगकरचीच निवड करण्यात आलेली नाही.
भारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते.
प्रसिद्ध कवयित्री सुगथाकुमारी याचं निधन

प्रसिद्ध मल्याळी कवयित्री आणि कार्यकर्त्यां सुगथाकुमारी (वय ८६) याचं निधन झालं आहे. ‘सुगथा टीचर’ नावाने त्या लोकप्रिय होत्या.
मल्याळम भाषेत समकालीन काळातील त्या प्रसिद्ध कवयित्री होत्या. सुगथाकुमारी या सहवेदना, मानवी संवेदनशीलता व तात्त्विक बैठक असलेल्या कविता करीत असत.
महिलांना मिळणारी वाईट वागणूक व निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला ऱ्हास याविरोधात त्यांनी सहा दशके लढा दिला. पर्यावरण व निसर्ग संवर्धनाच्या मुद्दय़ावर त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते.
पश्चिम घाटातील सायलेंट व्हॅलीत जलविद्युत प्रकल्प उभारण्यास विरोध करणाऱ्या आंदोलनात त्या आघाडीवर होत्या. अरणमुला येथील विमानतळाविरोधातील आंदोलनातही त्या सहभागही होत्या. परित्यक्ता महिला व अत्याचारग्रस्त महिलांचा त्या आधार होत्या. त्यांनी तीन दशके ‘अभया’ ही संस्था महिलांसाठी चालवली.
मुथचिपिकल हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९६० च्या सुमारास प्रसिद्ध झाला. पथीरापुक्कल, कृष्णकवीथकल, रात्रीमाझा, अंबलमणी, राधा एविदे, थुलावर्षांपाचा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध होते. केरळ राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्षा होत्या. त्यांना २००६ मध्ये पद्मश्री सन्मान देण्यात आला, तर २०१३ मध्ये मनालेझूठ या काव्यसंग्रहासाठी सरस्वती सन्मानही देण्यात आला होता.
प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ बंधनकारक

येथील टाेलनाक्यांवर हाेणारी गर्दी कमी करणे तसेच टाेल संकलनाचे डिजिटायझेशन करण्यासाठी प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाहनचालकांना राेख रक्कम देऊन टाेलनाक्यांवर थांबण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळेसाेबत इंधनाचीही बचत हाेणार आहे. जुन्या वाहनांनाही फास्टटॅग लावणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे फास्टटॅग?
फास्टटॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते. चिपला एक प्रीपेड खाते जाेडलेले असते. टाेलनाक्यावरून जाताना त्या खात्यातून आपाेआप टाेलचे पैसे वळते हाेतात. त्यामुळे जास्त वेळ थांबण्याची गरज राहत नाही.