⁠  ⁠

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे केंद्र बदलण्यास मुदतवाढ

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्‍टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या (PSI-STI Combine Exam) विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तर 20 सप्टेंबरला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्हा केंद्र निवड न करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या त्यांच्या अर्जातील कायमस्वरुपी रहिवासीचा पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करु न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल, दूरध्वनी क्रमांकावर लघुसंदेश दिला जाणार असून व्यवस्थेप्रमाणे निवडण्यात आलेल्या जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

ठळक बाबी..
महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या (PSI-STI Combine Exam)

  • राज्यसेवेची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्‍टोबर (रविवारी) रोजी घेण्याचे आहे प्रस्तावित.
  • लॉकडाउनमुळे बहुतांश विद्यार्थी गेले त्यांच्या मूळगावी; त्यांच्या सोयीसाठी आयोगाने बदलला निर्णय.
  • सद्यस्थितीत प्रवासावरील व तात्पुरत्या वास्तव्यावरील निर्बंध पाहून आयोगाने सर्वच उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची दिली संधी.
  • 21 ऑगस्टपासून दुपारी दोन ते 26 ऑगस्टपर्यंत रात्री 23.59 वाजेपर्यंत निवडता येणार परीक्षा केंद्र.
  • जिल्हा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश द्यावयाची कमाल क्षमता निश्‍चित करुन प्रथम येणाऱ्यास राहणार प्राधान्य.
  • संबंधित जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रवेशाची निश्‍चित केली आहे कमाल क्षमता.
Share This Article