⁠  ⁠

Mission PSI STI ASST 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 9 Min Read
9 Min Read

नमस्कार दोस्तहो, 

या वर्षी नक्कीच तुम्ही सततच्या परीक्षा देवून दमला असणार, अर्थात ज्यांनी मागील ४ महिन्यात अथक परिश्रम घेवून अभ्यास केलेला असेल त्यांनाच हे लागू ठरेल. या वर्षी MPSC आयोगाने प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याच्या अनेक संधी एका पाठोपाठ आपल्याला दिल्यात. काही Success होतील, काहींनी नक्कीच आपला बेस्ट प्रयत्न दिला असेल, काहींच्या थोड्या चुका झाल्या असतील, काहींचे प्रयत्न कमी पडले असतील.

असो.. छोडो यारो कल कि बाते..

पण तुम्ही पुन्हा नवीन जोमाने आपल्या चुका सुधारून.. कमतरता मागे सारून.. पुन्हा एक प्रयत्न करण्याची हिंमत करणार असाल… तर या वर्षी आणकी एक मोठी संधी तुमच्या समोर आहे…

ती म्हणजे PSI STI ASST Combine Pre Exam 2018 अर्थात – सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी- सामाईक पूर्व परीक्षा २०१८

थोडक्यात जाणून घेऊ काय आहे ही Combine Pre Exam…

1.सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरतीकरीता सध्या आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या तीनही पूर्व परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. तरीही स्वतंत्र पूर्व परीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्व/अभ्यास, प्रवास, निवास, व्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना स्वतंत्रपणे व पुन्हा पुन्हा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. निवड प्रक्रियेतही विलंब होतो.

या बाबी टाळण्यसाठी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांवरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

तर हे बदल या वर्षी पासून अर्थात २०१७ पासून लागू होणार आहेत. आणि या नुसार पहिली संयुक्त पूर्व परीक्षा ही 13 मे 2018 रोजी होईल.

Click here for latest MPSC Exam Timetable )

आता या तीनही पदांकरीता संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन, अर्ज करणार्‍या उमेदवारांकडून ते या पैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित पदांकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्‍चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे तीनही पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.

त्यानंतर त्या-त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणार्‍या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ अशा इतर बाबींमध्ये कोणताही बदल नाही.

(म्हणजेच पूर्वी स्वतंत्र घेण्यात येणाऱ्या या ३ पूर्व परीक्षा – PSI, STI, ASST. आता संयुक्तपणे घेण्यात येतील अर्थात तीनही पूर्व परीक्षांसाठी Exam Pattern, अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ एकसारख्या असल्या कारणाने हे शक्य आहे.)


2.यानंतर सर्वात महत्वाचे ठरते ते म्हणजे परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) , अभ्यासक्रम (Syllabus)
जाणून घेणे.

परीक्षा योजना : (पूर्व)

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण Negative
Marks System
माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी १०० १०० -१/४ प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे मराठी व इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ
MCQ

अभ्यासक्रम : (पूर्व)
सामान्य क्षमता चाचणी 

1) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

2) नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

3) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

4) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

5) अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

6) सामन्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), नवस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)

7) बुद्धीमापन चाचणी व अंकगणित

( CLICK HERE for SYLLABUS )

      अर्थात हा फक्त नवीन अभ्यास सुरु करणाऱ्यांसाठीचा भाग आहे असे नाही. वेळोवेळी अभ्यासक्रमाचा (Syllabus) आढावा घेत राहणे खूप आवश्यक ठरते. यावरूनच परीक्षेची नेमकी Subject Wise Demand लक्षात येऊ शकते. आणि आपल्या अभ्यासातला Randomness-Vagueness कमी केला जावू शकतो.

3.आपला अभ्यास To The Point आणि Focused राहण्यासाठी आणिखी एक गोष्ट Must आहे. ती म्हणजे आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण.

( CLICK HERE for Previous Year Question Paper )

So As Of Now. You must have done with Exam Structure, Syllabus, Previous Year Question Paper Analysis thoroughly. I presume you have done all these activities Seriously. If Not Go back Study All this for a couple of days And then Follow the below strategy. Remember Unless and Until it is not done, the base for Exam cannot be built.

वरील सुचवलेल्या सर्वच Activities या परीक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत. अभ्यासचा मुलभूत पाया Set करण्यासाठी याचा उपयोग होईल. यात २ दिवस गेलेत तरी हरकत नाही. लवकरच मी प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण कसे करावे यावर Short Points देईल. (According To Response and Demand).

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवरून तुम्हला थोडक्यात प्रश्नांची काठीण्यपातळी, विषयांरूप प्रश्नांचे स्वरूप, कोणत्या विषयात कशावर Focus केलेला आहे या गोष्टी लक्षात येतील.  या बाबी शेवटी Smart Study करतांना (कमी वेळात जास्त अभ्यास) (Input-OutPut Ratio Maintain करणे) आणि आपला Score वाढवण्यासाठी उपयोगात येतात.

PSI STI ASST 2017 – Previous Question Paper Analysis )

4.मित्रांनो आता वळूयात Actual Strategy कडे —

साधारण ७५ दिवसांवर येऊन ठेपलेली – म्हणजेच 13 मे 2018 रोजी होणाऱ्या PSI STI ASST Combine पूर्व या परीक्षेच्या अनुषंगाने लिहित आहे. त्याचीच ही सुरुवात… अगदी पहिल्यांदाच होत असलेल्या या Combine Pre २०१८ साठी नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातून रेकॉर्ड ब्रेक उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करतील. या वर्षीची ही एक आणखी मोठी संधी असल्यामुळे आपण आपल्या अभ्यास पद्धतीत व नियोजनात काय वेगळेपण (स्मार्टनेस) आणतोय यावर बरचसं यश-अपयश अवलंबून असेल.

लवकरच आयोगामार्फत परीक्षेची जाहिरात येईल आणि मग सगळे अभ्यासाला लागतील. त्याआधीच सुरवात करूयात… You will have better chance to Get In. 

आम्ही “Mission MPSC” च्या माध्यमातून आपणास शक्य तेवढे मार्गदर्शन आणि नियोजनपूर्ण Strategical Study-Plan देण्याचा प्रयत्न करतोय. या सोबतच Daily Current Events देण्याचा प्रयत्न असेल.

मागील काही वर्षांपासूनचा Cutoff लक्षात घेता साधारण ५० स्कोर हा Qualifying असू शकेल तर ५५+ Safe Scoreअसू शकेल. हे मात्र एक अंदाज आहेत जे प्रश्नपत्रिकेनुसार बदलू शकतील. आपण ६०+ score हेच ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची Strategy बनवावी. आम्ही देखील या विषयावर हे अनुमान लक्षात घेऊनच काम करतोय.

दरम्यान अनेक messges मधून एकच प्रश्न विचारण्यात येतोय ७५ दिवसात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य आहे का…?
माझ्या मते हो हे शक्य आहे… 

Provided-
* How Efficiently and Smartly you study?. (स्टडी प्लॅन)
* तुमचा शालेय अभ्यासक्रमचा बेस.
* परीक्षेबाबतचा तुमचा समज. etc…
यातील काही बाबींवर आम्ही बोलत राहू, काही आपण विचार करण्यासारख्या आहेत.

सुरुवातीलाच मी नम्रपणे सांगू इच्छितो आम्ही जे मार्गदर्शनपर लिहितोय ती सर्वानाच उपयोगी ठरेल असे अजिबात शक्य नाही. जे वर्षभरापासून अभ्यास करत आहेत आणि जे अगदीच नवीनच या क्षेत्राचा विचार करत आहेत, अशा परीक्षार्थींना कदाचित हे नियोजन लागू होणारही नाही. मात्र बहुतांशी विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा हा सर्वसमावेशक Approach आमचा निश्चित असेल. त्याचप्रमाणे कोणतीही स्ट्रॅटेजी किंवा नियोजन सरसकट यशस्वी होईल असेही नसते. तेव्हा वेळेनुसार परिस्तिथीनुसार यात बदल करता यायला हवा याचंच नाव MPSC आहे.

तेव्हा वेळ न घालवता आपण कामाला लागूयात…
लवकरच Overall Study Plan and Subject Wise Strategies Upload केल्या जातील.. तत्पूर्वी तुम्ही मागील प्रश्नपत्रिका सोडवून त्यांचे विश्लेषण नक्कीच करू शकतात.

Stay Tune with this Page.
I Hope this will help you in Your Journey.

सोबतच आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट्स करून नक्की कळवाव्यात.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

[amazon_link asins=’B073SSDJ7L,B06XJM617R,B01N23CQWG,8193232003,B076HMTBKY,B0733C8519,B0728GQGVG,B072562K37,B072VL77R8′ template=’ProductCarousel’ store=’mimp-21′ marketplace=’IN’ link_id=’53c49984-1bd4-11e8-bb02-21c1b6fc0d10′]

Share This Article