⁠  ⁠

राज्यसेवा मुलाखत तयारी – विशाल नाईकवाडे

Mission MPSC
By Mission MPSC 4 Min Read
4 Min Read

राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेल्या सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन…!

मुख्य परीक्षेसाठी तुम्ही खूप अभ्यास केला असेल त्यामुळे स्वतःसाठी आणि मित्रमंडळी, कुटुंबासाठी थोडा वेळ द्या, मस्त मजा करा. परंतु शर्यत अजून संपलेली नाही. राज्यसेवेतील अंतिम आणि निर्णायक टप्पा म्हणजे मुलाखत. तशी मुलाखतीची तयारी ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण आपल्या सभोवतालचे जग उघड्या डोळ्यांनी कसे बघतो, त्याचा कसा विचार करतो, त्यावर कसे रिऍक्ट होतो,मी कोण, माझ्या आवडी निवडी काय हे खूप महत्वाचे आहे. मुख्य परीक्षा ऑक्टोबर मध्ये झाल्यानंतर साधारणतः मुख्य परीक्षेचा निकाल डिसेंबर शेवटी लागून जानेवारीत मुलाखती होतात. म्हणजे अजून 3-3.5 महिन्यांनी तुम्हाला मुलाखतीला सामोरे जायचे आहे. मला मुलाखतीला नेहमीच कमी मार्क्स मिळाले आहेत परंतु 3-4 मुलाखतीच्या आधारे आलेल्या अनुभवावर काही गोष्टी शेअर करत आहे.

अपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – @MissionMPSC

1. पहिली गोष्ट मला थोडे कमी मार्क आलेत मला मुलाखतीला कॉल येणार नाही हा भ्रम डोक्यातून काढून टाका, या एका भ्रमामुळे अनेकांनी 1-2 मार्कांनी पोस्ट गमावल्या आहेत किंवा क्लास-1 मिळण्याची शक्यता असताना क्लास-2 वर त्यांना समाधान मानावे लागले आहे.

2. याउलट काही लोकांनी मुलाखतीला चांगले मार्क्स घेऊन आपली पोस्ट सेक्यूअर केली आहे.

3. मुख्य परीक्षेतील मार्क्स तुम्ही मुलाखतीला पात्र आहे कि नाही हे ठरवेल परंतु तुम्ही क्लास-1 होणार की क्लास-2 हे मुलाखत ठरवेल.

4. एक गोष्ठ लक्षात घ्या Answer key ने मराठी-इंग्लिश चे मार्क्स समजणार नाहीत (100 मार्क्स) आणि मुलाखतीचे 100 मार्क्स आपल्या हातात आहेत.

5. तुमच्या ज्या मित्रांनी मुख्य परीक्षा दिली आहे त्यांचा एक ग्रुप बनवा.

6. सुरवातीला ज्ञानदीप अकादमीचे कैलास आंडील (तहसिलदार) संकलित मुलाखतीची तयारी आणि आनंद पाटील सरांचे मुलाखतीसाठीचे पुस्तक घ्या.

7. दोन डायरी घ्या एक तुमचा biodata, जिल्ह्यासाठी दुसरी चालू- घडामोडी साठी.

8. पहिल्या डायरी मध्ये तुमची स्वतःची आणि जिल्ह्याची पूर्ण माहिती यात तुमची शाळा/कॉलेज/विद्यापीठाचे नाव, महापुरुषांचे नाव असेल तर त्यांचे कार्य, विद्यापीठाचा लोगो, सध्याचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी (प्रसिद्ध), संस्थेचे कार्य, घरचा मुख्य व्यवसाय, शेतीचे डिटेल्स, उत्पादन खर्च, उत्पन्न, तुमच्या भागातील प्रमुख पिके, उसशेती अर्थकारण, दुष्काळ, तुमच्या गावचे जिल्ह्याचे सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक,राजकीय महत्व. तुमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी. तुमचे छंद, तुमच्या जिल्ह्याच्या काही प्रमुख समस्या त्यावर उत्तरे. प्रत्येक जिल्ह्याची एक अधिकृत वेबसाईट असते तिचा इथे पुरेपूर वापर करून घ्या.

9. दुसऱ्या डायरी मध्ये चालू घडामोडी संबंधित एक एक विषय घेऊन त्याच्या सकारात्मक, नकारात्मक आणि संविधानात्मक बाजू या अनुषंगाने टिपणे काढा, या कामी जुन्या मासिका मधून महत्वाचे issue काढून घ्या.

10.मुलाखतीला तुम्ही पोस्ट साठीचा Preferences भरून द्यावा लागतो तो खूप काळजी पूर्वक ठरवणे.

11. preferences भरण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक पदाची कार्ये कर्तव्ये जबाबदाऱ्या माहिती करून घ्या आणि आपली आवड पहा.

12. इथे प्रत्येक पदावर कार्य करणाऱ्या एका एका अधिकाऱ्याला प्रत्यक्ष त्याच्या कामाच्या ठिकाणी ग्रुप ने जाऊन भेटल्यावर प्रचंड फायदा होतो असा माझा अनुभव आहे.

13. मुलाखतीचा फोकस एक नोकरी करणारे दुसरा न करणारे असा वेगळा आहे. नोकरी करणाऱ्या उमेदवाराची निम्मी मुलाखत नोकरी वरच होते आणि न करणाऱ्या उमेदवाराची बऱ्यापैकी तुमच्या डिग्री वर होते असे निरीक्षण आहे.

14. नोकरी करत असाल तर तुमचे काम नीट जाणून घ्या,कामा संबंधित योजना, शासननिर्णय, तुमचा रोल, तुम्ही केलेले वेगळे प्रयत्न, प्रॅक्टिकल गोष्टी.

15. नोकरी करत नसाल तर तुमच्या डिग्री चे विषय, संकल्पना, सद्यस्थिती, एवढे दिवस काय केले. (या प्रश्नाचे उत्तर सकारण तयार करा.)

16. मुलाखतीच्या काळात व्हाट्सऍपचा ग्रुप बनवून मुलाखती झालेल्या उमेदवारांनी आपापल्या मुलाखती लिहून शेअर केल्यास प्रत्येक पॅनेल मेम्बर्स चे orientation लक्षात येईल.

17. या काळात नेहमी बोलत रहा, व्यक्त व्हा, प्रश्नांची उत्तरे तयार करून मोठ्याने अरश्या समोर बसून मोठ्याने बोला.

18. 2-3 न्युजपेपर, मासिके वाचा, TV वरील विविध वादसंवाद पहा.

19. दररोज व्यायाम करा, बॉडी language सुधारते, आणि आत्मविश्वास येईल.

20. शेवटी सकारात्मक रहा.

शुभेच्छा…!

– विशाल नाईकवाडे
(परिविक्षाधिन तहसिलदार)

अपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC

Share This Article