⁠  ⁠

PSI Exam Syllabus in Marathi 2016

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 6 Min Read
6 Min Read

राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यासक्रम खाली देत आहोत. तसेच १२ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेसाठी ‘मिशन एमपीएससी’तर्फे विशेष लेखमाला सुरु करण्यात येत आहे. ‘मिशन पीएसआय २०१६’ ही लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा योजना व अभ्यासक्रम

परीक्षा योजना

प्रश्‍नपत्रिका – एक. प्रश्‍नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी

संकेतांक क्र. ०१२

१०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ

अभ्यासक्रम :
सामान्य क्षमता चाचणी  (विषय संकेतांक -012) – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

1) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

2) नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

3) आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

4) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

5) अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

6) सामन्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), नवस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)

7) बुद्धीमापन चाचणी व अंकगणित


[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]


पोलीस उपनिरीक्षक, गट – ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा

परीक्षा योजना
प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्‍नपत्रिकांतील संख्या – दोन.प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे

पेपर क्रमांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी
संकेतांक ००२ मराठी

इंग्रजी

६०

४०

६०

४०

बारावी

पदवी

मराठी

इंग्रजी

एकतास
संकेतांक ०२५ सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान १०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास

अभ्यासक्रम
पेपर क्रमांक – 1 मराठी व इंग्रजी
१) मराठी:- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे

2) इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaing and comprehension of passage.

पेपर क्रमांक – 2
सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान  – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

1) चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

2) बुद्धिमत्ता चाचणी

3) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्‍न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.

4) महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ

5) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

6) माहिती अधिकार अधिनियम – 2005

7) संगणक व महिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.
8 मानवी हक्क व जबाबदार्‍या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानव, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा या सारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

9) मुंबई पोलीस कायदा

10) भारतीय दंड संहिता

11) फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973

12) भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act.)

विशेष सूचना –

सुधारीत अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या घटकांपैकी “भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय पुरावा कायदा या तीन घटकांच्या प्रश्‍नांचे स्वरुप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणाताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल या विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.”

पीडीएफ अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

[table id=7 /]


[quote arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]

Share This Article