एमपीएससीमार्फत २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्याची स्थिती नुकतीच जाहीर केली आहे. हे वेळापत्रकाची पीडीफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी घेतल्या जाणाºया परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे आयोगाकडून अनेक पदे भरली जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सेवा परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून राज्य सेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल रोजी तर मुख्य परीक्षा ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत घेतली जाणार असल्याचे अंदाजित वेळापत्रकावरुन स्पष्ट होत आहे.
सहायक मोटार वाहन निरिक्षक परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२० मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्वपरीक्षा १५ मार्च रोजी तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी घेतली जाणार आहे. वन सेवा परीक्षेसाठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या पदासाठी १५ मे रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.