MAFSU Recruitment 2022 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.
एकूण जागा : ०६
पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
१) विषय विशेषज्ञ/ Subject Matter Specialist (Agronomy) ०१
शैक्षणिक पात्रता : कृषीशास्त्र किंवा संबंधित विज्ञान / सामाजिक विज्ञानाच्या इतर कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समतुल्य पात्रता
२) विषय विशेषज्ञ/ Subject Matter Specialist (Animal Science) ०१
शैक्षणिक पात्रता : प्राणी/ पशुवैद्यकीय विज्ञान/ पशु पोषण/ पशुधन उत्पादन व्यवस्थापन/ कुक्कुटपालन विज्ञान/ प्राणी आनुवंशिकी आणि प्रजनन/ पशुवैद्यकीय विस्तार मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान/सामाजिक शास्त्राची इतर कोणतीही शाखा संबंधित
कृषी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
३) कार्यक्रम सहाय्यक/ Programme Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : संगणक विज्ञान किंवा संगणक अनुप्रयोगातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
४) लघुलेखक श्रेणी – III/ Stenographer Category – III ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण ०२) उमेदवाराला इंग्रजी व मराठी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट या दराने १० मिनिटांची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच उमेदवाराने इंग्रजी मधुन ५० मिनिटांमध्ये तर मराठी मध्ये ६५ मिनिटांमध्ये संगणकावर लिप्यंतर करणे अनिवार्य राहील.
५) वाहन चालक/ Driver ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १० वी उत्तीर्ण ०२) जड आणि हलके वाहन चालविण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याचा वैध परवाना इष्ट पात्रता ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित विषयाचे एक वर्ष कलावधीचे प्रमाणपत्र (Trade Certificate) यांना प्राधान्य दिले जाईल. ०२) मान्यताप्राप्त संस्थेमध्ये वाहन चालविण्याचा अनुभव ०३) वाहन यांत्रिकी कामाचाअनुभव.
वयो मर्यादा : ४५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ५६,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन कोड -४००००६.
अधिकृत संकेतस्थळ : www.mafsu.in
अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा