⁠  ⁠

महिला व बाल विकास विभागात मोठी भरती ; 12वी ते पदवीधरांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

WCDD Bharti 2022 : महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र (District Women & Child Development Department Maharashtra) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा : १९५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.

संरक्षण अधिकारी (Protection Officer)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.

कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी असणं आवश्यक आहे.

समुपदेशक (Counsellor)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / समुपदेशन मध्ये पदवीधर. किंवा पीजी डिप्लोमा इन काउंसिलिंग अँड कम्युनिकेशन.पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.

सामाजिक कार्यकर्ता (Social Worker)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/समाजशास्त्र/सामाजिक विज्ञान या विषयात प्राधान्याने बी.ए. .पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.

लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य/गणित विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे.

डेटा विश्लेषक (Data Analyst)
शैक्षणिक पात्रता
: मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / संगणक (BCA) मध्ये पदवी असणं आवश्यक आहे.

सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता :
संगणकातील डिप्लोमा / प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड / समकक्ष मंडळातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

आउटरीच वर्कर (Outreach Worker)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्ड/ समकक्ष मंडळातून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे

वयाची अट : ०२ ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे.

परीक्षा फी : १५०/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :19 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.wcdcommpune.com
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article