⁠
Jobs

राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! आता ‘या’ विभागात होणार बंपर भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. नुकतीच राज्यात तलाठी पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यानंतर राज्यातील काही विभागात लवकरच मोठी भरती निघणार आहे.

त्यात राज्यातील कृषी सेवकांची 2070 पदे भरली जाणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेत अंतर्गत शिक्षक पदांची मोठी भरती होणार आहे. शिक्षण म्हणून रुजू होण्याची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत या नोकरीसाठी जाहिरात येणार आहे.

राज्यातील कृषी सेवकांची 2070 पदे भरली जाणार यासाठी कृषी विभागतील नव्या भारतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. कृषी विभागातील 80 टक्के रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि लातूर या विभागात भरती होणार आहे.

पुणे महानगरपालिका 6 महिन्यांसाठी करार पद्धतीने पुणे महापालिका शिक्षक भरती करणार आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या 508 रिक्त जागांपैकी 329 शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहे. ही भरती झाल्यानंतरही शिक्षकांच्या 179 जागा रिक्त राहणार आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत देखील भरती निघाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या भरतीद्वारे अंगणवाडी मदतनीस पदे भरली जात आहे.

दरम्यान, राज्यात तलाठी पदांच्या एकूण 4644 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच निघालीय. या भरतीची तरुण अनेक दिवसापासून वाट पाहत आहे. पदवी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी राहणार आहे.

Related Articles

Back to top button