---Advertisement---

दोन्ही बहिणी ठरल्या सरस; एकाच वेळी झाल्या प्रशासकीय अधिकारी !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Success Story लहानपणापासून नम्रता आणि जयश्री ह्या हुशार मुली. त्यांना प्रचंड शिक्षणाची आणि वाचनाची आवड आहे. साक्री तालुक्यातील भामेर येथील मूळ रहिवासी असल्या तरी व्यवसायानिमित्त नाशिक येथे हे संपूर्ण कुटुंब स्थायिक झालेले होते. विठ्ठल सोनवणे व वंदना सोनवणे यांच्या ह्या दोन्ही मुली.

विठ्ठल सोनवणे काही वर्षांपासून छोट्या-मोठे काम करून आपले घर, संसार चालवत आहेत. सध्या, ते नाशिक येथे स्थायिक झाले असून, त्याच ठिकाणी लहान-मोठ्या कामातून ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांनी नाशिकमध्ये पदवीपर्यंत शिकवले.

---Advertisement---

या संपूर्ण परिस्थितीची जाण मुलींना पण होती. त्यांनी शिक्षणासाठीदेखील प्राविण्य मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्या दोघांचेही अधिकारी होण्याचे स्वप्न होते तसा त्यांनी अभ्यास देखील केला.मोठी मुलगी नम्रता सोनवणे हिने नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली, तर लहान मुलगी जयश्री सोनवणे हिने एलआयसीच्या विकास अधिकारी या वर्ग दोनच्या पदांची परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारीपद मिळवले.सोनवणे भगिनींच्या यशाच्या निमित्ताने भामेर गावाचेदेखील नाव उंचावले आहे.यांचा हा संपूर्ण प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts