---Advertisement---

लग्नानंतर देखील तिने करून दाखवलं; संसारगाडा सांभाळत अश्विनी बनली पोलिस !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ग्रामीण भागातील बहुतांश मुलींची लवकर लग्न होतात. यात आता पुढे काय करायचं? आपलं स्वप्न कसं पूर्ण करायचे? हा प्रश्न अनेकांपुढे उभा करतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अश्विनी विकास गायकवाड. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील ही लेक. तिने कमी वयात लग्न झाले. मग, शेतकरी कुटुंबातील वळवळ, पुढे संसारगाडा आणि मुलगी या सगळ्यात तिने शिक्षणाची वाट मात्र सोडली नाही.रोडेवाडी येथील गायकवाड कुटुंबातील सून अश्विनी गायकवाड.

तिचे बारावी झाल्यावर लग्न झाले. तिने विज्ञान विभागातून बारावी परीक्षा उत्तीर्ण केली. विवाहानंतर पती व सासरच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुढे शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला बघता – बघता पदवी देखील मिळाली‌. विवाहानंतर अडीच वर्षाची लहान मुलगी तसेच संसाराची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत जिद्दीने वर्षभर दररोज दोन तास मैदानी सराव केला. तिने रोजच्या दिवसाचे नियोजन आखले होते.

---Advertisement---

त्यानुसार, अभ्यास, घरची कामे आणि जबाबदारी, मैदानी सराव चालू होता. गेल्या एक वर्षापासून त्या पाच किलोमीटर अंतरावरील पारगाव येथे पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण देणाऱ्या सक्षम अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होती.अडीच वर्षाची लहान मुलगी तसेच संसाराची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत जिद्दीने वर्षभर दररोज दोन तास मैदानी सराव करून पोलीस पदी निवड झाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts