⁠
Inspirational

गावोगावी जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याची लेक बनली पोलीस अधिकारी

MPSC Success Story : प्रयत्नार्थी परमेश्वर हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. सातत्य, मेहनत, जिद्द आणि ज्वलंत इच्छाशक्ती असल्यास आपण अशक्य ही शक्य करू शकतो याचेच उत्तम उदाहरण म्हणजे जळगाव शहरातील कोमल सोपान शिंदे. कोमल ही मूळची जळगाव येथील रहिवासी आहे. कोमल चे वडील गावोगावी जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय करतात व आई जैन इरिगेशन मध्ये कामाला आहे. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग काढत एक दिवस यशाचे शिखर आपण नक्की गाठतो.

देशभरात लाखो तरुण यूपीएससी एमपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करत असतात. परंतु या परीक्षांमध्ये सगळ्यांनाच यश मिळेल असे नाही अनेकांना अपयशाचा देखील सामना करावा लागतो परंतु तरी देखील हजारो तरुण या परीक्षेची तयारी करतात असेच स्वप्न कोमलचे देखील होते. कोमलने वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर एम एस डब्ल्यू पूर्ण केले व त्यानंतर एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

या परीक्षेसाठी सातत्य, मेहनत आणि जिद्द असणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागते. कोमल ही 12-12 तास अभ्यास करायची, त्यानंतर आईला घर कामात मदत देखील करायची. तिने कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नाही व सोशल मीडियापासून म्हणजेच व्हाट्सअप असो की मोबाईल यापासून लांब राहून अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते, अशी माहिती कोमलच्या आईने माध्यमांना दिली आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही किंवा आपण करू शकलो नाही त्या सर्व गोष्टी आपल्या पाल्याने पूर्ण करावे याच इच्छेने कोमलच्या वडिलांनी देखील स्वतःचे शिक्षण झाले नाही. परंतु मुलीने शिकावे हा निश्चय केला होता व मुलगीने त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना दिले याचा मोठा आनंद त्यांना होतो.

2019 मध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी कोमलने सुरू केली व कोमल यांना पहिला प्रयत्न यश आले नाही. परंतु खचून न जाता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुन्हा अर्ज केला व सप्टेंबर 2022 मध्ये पुन्हा परीक्षा दिली या परीक्षेत कोमल या उत्तीर्ण झाल्या असून त्या आज पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गावकऱ्यांनी कोमल यांची घोड्यावर वाजत गाजत गावातून मिरवणूक देखील काढली.

Related Articles

Back to top button