महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी ०५ मार्च २०२५ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे.
एकूण रिक्त जागा : 70
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – 41 पदे
अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ – 13 पदे
कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ – 16 पदे
शैक्षणिक पात्रता :
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग), बी.टेक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग)
अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा)
कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला आणि वाणिज्य विषयातील पदवीधर उमेदवार (१०+२+३ पॅटर्ननुसार). कला आणि वाणिज्य विषयातील पदवीधर उमेदवारांनी MS CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
किती पगार मिळेल:
प्रशिक्षण कालावधी १ वर्षाचा राहील. प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवाराना रु.९,०००/- व पदविकाधारक उमेदवारांना रु.८,०००/-दरमहा अदा करण्यात येईल
परीक्षा फी : फी नाही
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे
निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी नुसार
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक
मुलाखतीची तारीख – ०५ मार्च २०२५
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा