UPSC Success Story : नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवार दिवसरात्र मेहनत करतात. त्यानंतरही बरेच लोक निराश होतात. यूपीएससी (UPSC) परीक्षेत उमेदवारांची स्वतःची वेगवेगळी रणनीती असते. खूप कमी लोक असतात ज्यांच्या रणनीतीमुळे त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. त्यापैकी एक म्हणजे सुरभी गौतम. मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातील रहिवासी सुरभी गौतम (Surabhi Gautam) लाखो मुलींसाठी एक उदाहरण आहे.
सुरभि गौतम यांनी खूप मेहनत करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. सुरभि या मूळच्या मध्य प्रदेशाच्या रहिवासी. त्यांचे वडील वकील आहेत. त्यांची आई शिक्षिका आहे. लहानपणापासूनच ती अभ्यासात खूप हुशार होती. सुरभि गौतम यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावात राहून केले.
दहावी, बारावीत स्टेट टॉपर लिस्टमध्ये आपले नाव मिळवलं.त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण गावात केले. यानंतर त्यांनी इंजिनियरिंगची परीक्षा दिली. यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी शहरात येण्याचा निर्णय घेतला. सुरभि यांनी भोपाळ येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरिंग केले होते.
सुरभि यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले असल्याने त्यांनी इंग्रजी बोलण्यात खूप अडचणी आल्या. यामुळे अनेकांची त्यांची मज्जा घेतला. त्यांना चिडवलं. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रोज १० नवीन शब्द शिकण्याचे ठरवले. यामुळे त्यांनी सहामाही परीक्षेत टॉप केले. त्यांनी विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले.
सुरभि यांनी इंजिनियरिंगनंतर BARC मध्ये काम केले. याचसोबत त्यांनी स्पर्धा परीक्षेती तयारी केली. २०२३ साली त्यांनी आईईएश परीक्षेत टॉप केले.यानंतर पुन्हा २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांनी ५० रँक मिळाली. यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या. तुमच्याकडे जर शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करु शकतात हे सुरभि यांनी दाखवून दिले आहे.