---Advertisement---

आई मनरेगाअंतर्गत मजुरी करून घर सांभाळायची, मुलागा मोठ्या जिद्दीने बनला IAS ऑफिसर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : परिस्थिती कशीही असली तरीही त्यावर मात करण्याची ताकद ही प्रत्येकात असते. अनेकदा आपल्याला परिस्थितीमुळे हिणवले जाते. परंतु हीच परिस्थिती तुम्ही बदलू शकतात. अशीच परिस्थिती राजस्थानच्या हेमंत पारीक (Hemant Pareek) यांनी बदलली आहे.

आई मनरेगाअंतर्गत मजुरी करायची. त्यातून त्या घर सांभाळायच्या. त्यांचे वडिलांची आणि बहिण नेहमी आजारी असायचे. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी ही आईच्या खांद्यावर होती. हेमंत यांचा स्वतः चादेखील एक हात काम करायचा नाही. परंतु परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी आपल्या आईसाठी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. ते सध्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

---Advertisement---

हेमंत हे काही दिवसांनी हरियाणा येथे गेले. तिथेही त्यांची आई मजुरी करायची. त्यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले. परंतु याच परिस्थितीने त्यांना ताकद दिली. एकदा एका सावकाराने हेमंत यांच्या आईला कामाचे २२० रुपये दिले नव्हते. तेव्हा हेमंत यांनी हे पैसे मागितले. तेव्हा सावकाराने त्यांची खिल्ली उडवली आणि ‘तू काय कलेक्टर आहेस?, असं म्हणाले.

या एका वाक्यानंतर हेमंत यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्येही सिनियर्स त्यांची खिल्ली उडवायचे. मात्र, याचवेळी त्यांनी आयएएस अधिकारी बनून स्वतः ला सिद्ध करण्याचे ठरवले.हेमंत यांना दहावीपर्यंत बिल्कुल इंग्रजी येत नव्हते. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अॅग्रीकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केले.

हेमंत यांना स्कॉलरशिप मिळण्याची आशा होती. मात्र तीदेखील बंद झाली. यामुळे त्यांना पैसे मिळत नव्हते. अनेकदा तर त्यांनी काहीही न खाता पिता दिवस काढलेत.कॉलेज झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अनेकदा त्यांनी हा निर्धार सोडण्याचाही निर्धार केला होता. परंतु त्यांच्या मित्रांनी त्यांची साथ दिली. त्यांनी २०२३ मध्ये ८८४ रँक मिळवली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now