NTPC Green Energy Bharti 2025 : एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये (NTPC) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १८२ पदे भरली जातील.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
१) अभियंता (आरई-सिव्हिल) – ४० पदे
२) अभियंता (आरई-इलेक्ट्रिकल) – ८० पदे
३) अभियंता (आरई-मेकॅनिकल) – १५ पदे
४) एक्झिक्युटिव्ह (आरई-एचआर) – ७ पदे
५) एक्झिक्युटिव्ह (आरई-फायनान्स) – २६ पदे
६) अभियंता (आरई-आयटी) – ४ पदे
७) अभियंता (आरई-सी अँड एम) – १० पदे
शैक्षणिक पात्रता : अभियंता पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात बीई/बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ३ ते १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.(सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा फी :
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पगार : वार्षिक रु. ११,००,०००/-
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT), अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ मे २०२५
अधिकृत संकेतस्थळ : ngel.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा