⁠  ⁠

10वी आणि 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AAI Recruitment 2025 : एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये १० वी आणि १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया ३० डिसेंबरपासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२५ आहे.

एकूण रिक्त जागा : ८९
रिक्त पदाचे नाव : ज्युनिअर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १० वी पास असणे गरजेचे आहे. तसेच मॅकेनिकल/ऑटोमोबाईल आणि फायरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी १२ वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल?
परीक्षा फी : १०००/-
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना ३१००० ते ९२००० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२५
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aai.aero/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article