देशासाठी अहोरात्र सीमेवर लढ्यासाठी धाडस लागतं. हेच अलिबाग तालुक्यातील बोरघरच्या पार्थ म्हात्रे याने करून दाखविले आहे. भारतीय लष्करात अग्निविर बनण्याचे स्वप्न उरात बाळगून ते आता सत्यात उतरले आहे.त्याचे शालेय शिक्षण बोरघर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण भिलजी बोरघर आणि उच्च माध्यमिक शिक्षण रेवदंडा येथे झाल्यावर त्याने देशसेवा करण्यासाठी निर्धार केला.
पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले नाही.अग्निविर बनण्यासाठी प्रयत्न असफल ठरत आहेत. म्हणून पार्थ यांनी नाद सोडला नाही. त्यांनी अधिक चिकाटीने आणि जिद्दीने सैन्यात भरती होण्यासाठीचा सराव सुरु ठेवला.तिसर्या प्रयत्नामध्ये त्यांनी सांताक्रूझ कलीना येथे झालेल्या भरतीमध्ये अग्निवीर बनण्याचे स्वप्नसत्यात उतरवले.
२०२३ मध्ये पार्थ म्हात्रे यांची निवड अग्निवीर म्हणून झाली. तो गोवा येथे प्रशिक्षणासाठी गेला. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता ते देशाच्या पश्चिम बंगाल सीमेवर कर्तव्यावर तैनात आहेत. अनेकांसाठी त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.