AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांच्या 147 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 2, 2023
Follow Us

AIIMS Recruitment 2023 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पाटणा मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त जागा : 147

रिक्त पदाचे नाव :
वरिष्ठ नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स ग्रेड-1) – 127
ट्यूटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर – 20

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून / भारतीय नर्सिंग कौन्सिलमधून B.Sc नर्सिंग / पोस्ट बेसिक B.Sc नर्सिंग पदवी. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)

वयोमर्यदा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 35 वर्षे. असावे. नियमानुसार वयात सूट मिळेल.
परीक्षा फी :
जर कोणत्याही सामान्य, ओबीसी उमेदवाराला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्याला 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या भरतीद्वारे SC ST ला 1200 रुपये भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर माजी सैनिक आणि अपंगांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

तुम्हाला किती पगार मिळेल?
वरिष्ठ नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स ग्रेड-1) 47,600/- ते 1,51,100/-
ट्यूटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर — 39,100/-

निवड पद्धत :
वरिष्ठ नर्सिंग अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेनंतर कौशल्य चाचणी होईल. कौशल्य चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवारच पात्र मानले जातील. परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल. परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि नमुना वरील अधिसूचनेत पाहता येईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :
10 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात पहा 1 : PDF
जाहिरात पहा 1 : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now