---Advertisement---

बाल विकास प्रकल्प अधिकारी मुंबई येथे ७३ जांगासाठी भरती ; ७ वी पास उमेदवारांसाठी संधी

By Chetan Patil

Published On:

bal vikas prakalp mumbai recruitment 2021
---Advertisement---

बाल विकास प्रकल्प अधिकारी मानखुर्द, मुंबई येथे अंगणवाडीमध्ये भरती प्रक्रिया निघाली आहे. मदतनीस पदांच्या एकूण ७३ जागांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ७३

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस/ Anganwadi Helper

शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता ७ वी पास किंवा अधिक

वयोमर्यादा : ०८ जून २०२१ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : शासन नियमानुसार देय राहील.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : ०८ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी, धारावी रूम नं. २०१, दुसरा मजला , छोटा सायन हॉस्पिटल, ६० फिट रोड, धारावी मुंबई – ४०००१७.

अधिकृत संकेतस्थळ : www.womenchild.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

१. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवस.

२. अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.

३. गुणवत्ता यादी व अंतिम निवड यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल.

४. उमेदवाराने निवड होणेबाबत कोणत्याही एजंट अथवा अन्य व्यक्तीस संपर्क साधू नये. उमेदवाराची फसवणूक झाल्यास निवड
समिती त्यास जबाबदार राहणार नाही.

५. अंतिम निर्णय निवड समितीचा राहील.

६. जाहिरातीनुसार प्राप्त अर्ज मान्य करणे अथवा संपूर्ण जाहिरात रद्द करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार विभागाकडे राखून ठेवण्यात येत आहे.

७. स्थानिक रहिवासी :- उमेदवार धारावी भागातील वर नमूद केलेल्या वार्डातील (विभागातील) स्थानिक रहिवासी असावा.

८. मासिक मानधन शासन नियमानुसार देय राहील.

९. लहान कुटुंब असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र.

१०. शासकीय संस्थेमधील/ शासन अनुदानीत संस्थेतील अनाथ महिलांनी व मुलींनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांचे प्रमाणपत्र जोडावे.

११. मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांचा जोडावा.

१२. मानधनी पदे असल्याकारणाने उमेदवार बदलीस पात्र राहणार नाही.

१३. मानधनावरील खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र/राज्य शासनाकडून मिळणे बंद झाल्यास त्यांची सेवा संपुष्टात येईल.

१४. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती साक्षांकीत असाव्यात.

१५. निवड होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now