BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 461 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. तब्बल 461 जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 461
रिक्त पदाचे नाव : साह्यकारी परिचारिका (प्रसविका)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
पगार : 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – 400012
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा