BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती केली जाणार आहे. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेकरिता क्षयरोद दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ आहे.
१२वी पास ते एमबीबीएस पदवी प्राप्त केलेले उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत क्षयरोग नियंत्रण संस्थेद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण ५१ जागा या भर्तीदारे भरल्या जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ७० वर्षे असावी.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. सिनियर वैद्यकिय अधिकारी (एसआरएमओ) पदासाठी एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी उमेदवाराने एमडी मायक्रोबायोलॉजी किंवा पीएचडी इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी केलेले असावे.
एपिडेमिओलॉजिस्ट पदासाठी एमबीबीएप पदवी प्राप्त केलेली असावी किंवा पीएचडी केलेली असावी.फार्मसिस्ट पदासाठी फार्मसीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असावा. लॅबोरेटरी तंत्रज्ञ पदासाठी १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अजून अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० ते ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, पहिला मजला,बावलवाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, चिंचपोकळी येथे पाठवायचा आहे.