---Advertisement---

वडील – मुलाने केली कमाल ; दोघेही झाले पीएसआय !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success story : पिता-पुत्राला एकाच दिवशी पोलिस उपनिरीक्षकपदाची हा दुग्धशर्करा योग जमून आल्या आहेत.बालपणापासून पोलिस सेवेचे आकर्षण होते. वडिलांनी त्याबाबत नेहमीच प्रोत्साहन दिले. नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून अभ्यास केला. शिरपूरला उत्तम दर्जाचे अध्ययन अन् मैदानी सरावाची सुविधा खूप मोलाची ठरली. वडिलांना व एकाच दिवशी उपनिरीक्षक पदाची संधी मिळाली.रोहनचे वडील गुरुदत्त पानपाटील १९९१ मध्ये पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी ३३ वषेर्षे सेवा बजावली आहे.

२०१३ मध्ये त्यांनी पोलिस खात्यांतर्गत ‘एमपीएससी’तर्फे घेण्यात आलेली पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र तब्बल ११ वर्षांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. ते सध्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाचक शाखेत सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर मुलाने देखील वडिलांचा आदर्श घेतला आहे. रोहनचे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर (ता. साक्री) येथील आ. मा. पाटील विद्यालय, तर माध्यमिक शिक्षण साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी मिळवली.

बालपणापासूनच वडिलांच्या खाकी गणवेशाचे त्याला आकर्षण होते. स्पर्धा परीक्षांकडे त्याचा कल असल्याचे पाहून वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले अन् त्यामुळे तो या परीक्षेच्या तयारीला लागला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यास केला.

यात त्याला यश आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत रोहन पानपाटील त्यांच्या संवर्गातून ३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.रोहनचे वडील तथा सहाय्यक उपनिरीक्षक गुरुदत्त पानपाटील यांनी २०१३ मध्ये खातेअंतर्गत दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन त्यांचीही उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली‌.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts