---Advertisement---

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत भरती २०२१ ; पगार २३ हजारापर्यंत

By Chetan Patil

Published On:

brihan mumbai police recruitment 2021
---Advertisement---

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विधी अधिकारी पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : ३

पदाचे नाव : विधी अधिकारी/ Law Officer

शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
२) अनुभव:-विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.
०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.

वयोमर्यादा : ३१ जुलै २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : विधी अधिकारी या पदाकरिता करारातील मासिक देय रक्कम रु.२०,००० + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३,०००/- असे एकूण रु.२३,०००/- दरमहा देय राहील. (उपरिनिर्दिष्ट) मर्यादपेक्षा) इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaipolice.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.