---Advertisement---

वडिलांचे स्वप्न केले पूर्ण; प्रज्योती बोबडेचा जिद्दीचा प्रवास…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आपल्याला एखादे ध्येय गाठायचे असेल त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. तसेच निरवांगी मधील बोबडे कुंटूब गेल्या अनेक वर्षापासुन वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम करीत आहे. तसेच बसस्टँडवरती छोटेसे किराणामालाचे दुकान चालवत आहे. वृत्तपत्र विक्रेता कै. बापुराव बोबडे व विजया बोबडे यांची थोरली मुलगी प्रज्योती…तिचे वडिल बापुराव यांचे १ एप्रिल २०२२ साली त्यांचा हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी प्रज्योतीने मनाने खचली होती.

शिक्षण अर्धवट सोडावे असा ही विचार मनामध्ये आला होता. मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाचा ध्यास घेतला. बारावीपर्यत शिक्षण घेत असताना सकाळी दुकानामध्ये वृत्तपत्र विक्रीचे काम केले. तसेच शाळा सुटल्यावर दुकानामध्ये काम केले.तिचे माध्यमिक शिक्षण पद्मभूषण वसंतदादा माध्यमिक विद्यालय निरवांगी व एन.ई.एस हायस्कुल निमसाखर मध्ये झाले.

---Advertisement---

अकरावी व बारावीचे शिक्षण वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयामध्ये झाले. उच्च शिक्षण कळंबमधील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्न होता. त्यात शेती कमी असल्यामुळे वृत्तपत्र विक्री व दुकानातुन येणाऱ्या पैशावरती कुटूंब चालविण्याची कसरत विजया बोबडे आईस यांना करावी लागत होती.

परिस्थिती बदलायची तर अभ्यास करायला हवा. त्यासाठी तिने अहोरात्र मेहनत घ्यायला सुरुवात केली.२०१९ मध्ये सी.ए ची पहिली परीक्षा फाउंडेशन उत्तीर्ण झाली. २०२० साली इंटरमेजिएट परीक्षा पास झाली. तीन वर्ष इंटरशिप केल्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या सीएच्या फायनल परीक्षेमध्ये यश मिळविले. आईची साथ या सगळ्यात मोलाची होती. तिने तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत पणाला लागली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts