⁠  ⁠

कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी भरती जाहीर ; पदवीधरांना मोठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Canara Bank Bharti 2024 : कॅनरा बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 3000
ज्यामध्ये 1302 पदे सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 740 पदे OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी, 479 पदे SC, 184 पदे ST, 295 पदे EWS आणि 112 पदे PwBD साठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

रिक्त पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सक्षम
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागणार नाही.

पगार : उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल.
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.canarabank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article