CCBL Bank Recruitment 2022 : सिटीझन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Citizencredit Co-operative Bank Ltd) मध्ये बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएट्स या पदांसाठी ही भरती होणार असून याबाबत अधिसूचना (CCBL Bank Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. या दोन पदांसाठी बँकेने अद्याप रिक्त पदांची संख्या जाहीर केलेली नाही. बँकेनुसार ही भरती मुंबई, पुणे, नाशिक, गोवा येथील शाखांमध्ये करायची आहे. इच्छुक उमेदवार https://ibpsonline.ibps.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट आहे
एकूण जागा : –
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) —
शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA, CS, ICWA, CFA, MBA, LLM, M.Tech
2) प्रोबेशनरी असोसिएट्स (PA) —
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 30 जून 2022 रोजी,
पद क्र.1: 20 ते 30 वर्षे.
पद क्र.2: 20 ते 26 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
निवड पद्धती :
निवड ऑनलाइन लेखी चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता निश्चित केली जाईल. परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत असेल. लेखी परीक्षा दोन्ही पदांसाठी स्वतंत्र असेल.
परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
परीक्षेत 200 गुणांचे 160 प्रश्न असतील. दोन तास दिले जातील. यामध्ये रीझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूडमधून 80 गुणांचे 40 प्रश्न, इंग्रजीतून 40 गुणांचे 40 प्रश्न, बँक आणि जनरल अवेअरनेसचे 40 गुणांचे 40 प्रश्न, परिमाणात्मक संख्यात्मक क्षमतेचे 40 गुणांचे 40 प्रश्न विचारले जातील.
नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, नाशिक & गोवा.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2022 (05:00 PM)
परीक्षा (Online): ऑगस्ट 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online