⁠  ⁠

चालू घडामोडी :१० जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 10 June 2020

करोनासाथीमुळे यंदा‘मॅगसेसे पुरस्कार’रद्द

करोनासाथीमुळे यंदा‘मॅगसेसे पुरस्कार’रद्द
  • आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून मान्यता पावलेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार यंदा करोनामुळे दिला जाणार नसल्याचे फिलिपाइन्समधील संघटनेने जाहीर केले आहे.
  • निस्वार्थ समाजसेवेसाठी आशियातील व्यक्तींना दिला जाणारा हा पुरस्कार गेल्या सहा दशकांच्या इतिहासात तिसऱ्यांदा रद्द झाला आहे.
  • कोविड-१९च्या साथीने संपूर्ण जगाचा कारभार थांबलेला असल्याने हा पुरस्कार यंदा रद्द करण्यावाचून अन्य पर्याय नसल्याचे पुरस्कार देणाऱ्या मनिला स्थित फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
  • या आधी १९७०मध्ये आर्थिक संकटाच्या वेळी तसेच १९९०मध्ये भीषण भूकंपाच्या वेळी हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता.
  • १९५७मध्ये विमान अपघातात मरण पावलेले फिलिपाइन्सचे लोकप्रिय अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत सुमारे ३३० महनीय व्यक्तींचा मॅगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यामध्ये मदर तेरेसा, तसेच फिलिपाइन्सचे माजी अध्यक्ष कोराझोन अक्विनो यांचाही समावेश आहे.

स्टेट बँकेची पुन्हा व्याजदर कपात

SBI
  • देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. बँकेची ही सलग १३ वी व्याजदर कपात आहे.
  • बँकेने तिचा एमसीएलआर ०.२५ टक्क्य़ाने कमी करत तो सध्याच्या ७.२५ टक्क्य़ांवरून वार्षिक ७ टक्के करत असल्याचे सोमवारी उशिरा जाहीर केले. त्याचप्रमाणे बँकेचा आधार दर वार्षिक ८.१५ टक्क्य़ांवरून पाऊण टक्के कमी करत तो ७.४० टक्के केला आहे. बँकेने सर्व मुदतीसाठीचे व्याजदर कमी केले आहेत.
  • बँक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) रेपो लिंक्ड कर्ज व्याजदरामध्ये (आरएलएलआर) मध्ये ०.४० टक्याने कपात केली आहे. ८ जूनपासून रेपो लिंक कर्ज व्याजदरामध्ये (आरएलएलआर) कपात होवून तो ७.०५% करण्यात आला आहे. कर्ज दरातील झालेल्या या कपातीमुळे गृह, शिक्षण, वाहन आदींसह सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आदी आरएलएलआरशी जोडलेली किरकोळ कर्जे आता स्वस्त दरात उपलब्ध होतील.

आणखी एक पृथ्वी आढळली…

आणखी एक पृथ्वी आढळली...
  • पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या केप्लर 160 या सुर्यमालेत पृथ्वीप्रमाणेच एका ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे.
  • तेथे मानवी वस्ती शक्‍य आहे का? याचा शोध घेतला जात आहे. ‘प्लॅनेट केओआय-456.04’ असे या ग्रहाचे नामकरण करण्यात आले असून, विशेष म्हणजे हा ग्रह त्याच्या सुर्यमालेत पृथ्वी इतक्‍याच अंतरावर वसलेला आहे.
  • एस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रोफिझिक्‍स या नियकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात या ग्रहाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. स्वीत्झर्लंड येथील कंपनीने बनविलेल्या एस्प्रेसो उपकरणाद्वारे घेण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर या ग्रहाचे पृथ्वीशी साम्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • प्लॅनेट केओआय-456.04 या ग्रहाचे आकारमान पृथ्वीइतके आहे, तर ग्रहाची कक्षा त्याच्या सुर्यापासून ( केप्लर 160) 378 दिवस इतकी आहे, जी पृथ्वीच्या बरोबरीची आहे. तसेच या ग्रहावर सुर्यापासून मिळणारा प्रकाश 93 टक्के इतका आहे.

Share This Article