अनेक वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये, उमेदवारांना चालू घडामोडींशी संबंधित साध्या प्रश्नांचीही उत्तरे देता येत नाहीत आणि सरकारी नोकरी मिळणे चुकते. हे लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी आम्ही चालू घडामोडी सादर करत आहोत.
पोप फ्रान्सिस यांचे निधनः
कॅथलिक धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन २१ एप्रिल २०२५ रोजी झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे झाला. त्याचे नाव जॉर्ज मारियो बर्गोलियो होते. पोप फ्रान्सिस हे पोपचा राज्याभिषेक झालेले पहिले जेसुइट होते.
आयएसएसएफ विश्वचषक :
अर्जुन बाबुटाने आयएसएसएफ विश्वचषकात पुरुषांच्या १० मीटर शर्यतीत सुवर्णपदक, एअर रायफल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
जगातील पहिले शहर :
आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालेल. असे करणारे हे जगातील पहिले शहर असेल. नवीन राजधानी शहर कृष्णा नदीच्या काठावर २१७ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापेल, जे ८,३५२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्राचा भाग असेल
फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव :
महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव घोषित केले. हे तलाव फ्लेमिंगोंसाठी विश्रांतीचे ठिकाण आहे.
विकासची यशस्वी चाचणी :
इस्रोने मानवांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या ‘विकास’ इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन गगनयान मोहिमेत वापरले जाईल.
बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सरावः
भारतीय हवाई दल युएईमध्ये होणाऱ्या बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव, डेझर्ट फ्लॅग-१० मध्ये सहभागी होतील. मिग-२९, जग्वार विमानांचा समावेश असेल.
एसी ईएमयू ट्रेन:
दक्षिण भारतातील पहिली इलेक्ट्रिक युनिट ट्रेन मल्टिपल सेवा चेन्नईमध्ये सुरू झाली. ही ट्रेन चेन्नई ते चेंगलपट्टू मार्गावर धावत आहे.
अँजिओप्लास्टीचे जनक यांचे निधनः
अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युअल कलारीकल यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारतातील पहिली अँजिओप्लास्टी केली.
परकीय चलन उलाढाल दुप्पटः
भारताच्या परकीय चलन बाजाराची सरासरी दैनिक उलाढाल २०२४ पर्यंत $६० अब्ज पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे २०२० मधील $३२ अब्ज पेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.
मायक्रो हार्ड ड्राइव्हः
चिनी शास्त्रज्ञांनी ‘पोक्सियाओं’ नावाचा मायको हार्ड डहव्ह तयार केला. ते तांदळाच्या दाण्यापेक्षा लहान आहे. ही हार्ड ड्राइव्ह ४०० पिकोसेकंदात डेटा प्रक्रिया करू शकते.