जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया येथे सफाईगार, पहारेकरी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.
एकूण जागा : १३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सफाईगार/ Sweeper ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) लिहिता वाचता येणे ०२) सूदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.
२) पहारेकरी/ Watchman ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) कमीतकमी ७ वी वर्ग मराठी भाषेसह उत्तीर्ण असावा ०२) सूदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.
वयोमर्यादा :
अ) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ पेक्षा कमी व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
ब) अनुसुचीत जाती/जमाती, ईतर मागास वर्ग किंवा व्ही.जे. एन.टी किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे मागास प्रवर्गाकरीता १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे. ज्या उमेदवाराची ५ (ब) नुसार) नियुक्ती होईल त्यास त्या प्रवर्गाची जात वैधता प्रमाणपत्र नियुक्ती पासून १ वर्षापर्यंत करून घेणे बंधनकारक राहील. जर नियुक्त उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र करून घेतले नाही किंवा सादर केले नाही, तर त्याची उमेदवारी रद्द समजण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत त्याची उमेदवारी खुल्या प्रवर्गात विचारात घेतल्या जाणार नाही. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास मुलाखतीचे वेळेस उमेदवार जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतो.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
सफाईगार पदाकरीता:
सातव्या वेतन आयोगानूसार वेतन स्तर (एस–१) या वेतन संरचनेत रू. १५,००० ४७,६००/- व नियमानूसार इतर देय भत्ते..
पहारेकरी पदाकरीता :
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर (एस-१) या वेतन संरचनेत रु १५,००० – ४७,६००/- व नियमानुसार इतर देय भत्ते.
नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया, सिव्हिल लाईन, गोंदिया.
अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in/gondia
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : PDF