DTP Maharashtra : ‘शिपाई’ पदांच्या 125 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता 10वी पास अन् पगार 47000 पर्यंत
DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शिपाई (गट-ड) पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 125
विभागीय रिक्त पदांची संख्या :
1) कोकण 28
2) पुणे 48
3) नाशिक 09
4) छ. संभाजीनगर 11
5) अमरावती 10
6) नागपूर 19
रिक्त पदाचे नाव : शिपाई (गट-ड) / Peon (Group – D)
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असावा
वयाची अट : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / भूंकपग्रस्त – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग – 900/- रुपये]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये पगार मिळेल. तसेच अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते मिळतील.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.dtp.maharashtra.gov.in