आपली परिस्थिती हीच आपल्यासाठी प्रेरणा असते.कितीही अपयश आलं, संकटं आली तरी ती मागे टाकून, सतत पुढे जाण्याची जिद्द आणि आशा त्याच्याकडे असली की सगळं काही शक्य होतं. हेच त्यांनी करून दाखवले. संतोष कुमार पटेल हे मध्य प्रदेशातील देवगाव या गावात तुटपुंज्या साधनांसह गरिबीत राहत होते. आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे ते वीटा उचलण्याची कामे करत होते.
यांचे वडील जेथे बांधकामाच्या ठिकाणी काम करायला जायचे आणि तेथे जाऊन त्यांना विटा उचलण्यास मदत करीत असत. तसेच, ते आईलादेखील शेतात मदत करीत असत. कधी विहिरी खणायला जा तर कधी बांधकाम मदत, तर कधी शेतात कामे….हे सारे चालू असताना त्यांनी शिक्षणाची कास मात्र सोडली नाही.त्यांचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. त्यानंतर त्यांनी जवळच्या शहरात जावून अभियांत्रिकी शिक्षण घेतले.
त्यांच्या चांगल्या दिवसांत भात खायचे, बाकीचे दिवस फक्त दलिया (गहू) खायचे. अशा परिस्थितीत देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. १५ महिन्यांच्या तयारीनंतर त्यांनी जुलै २०१७ मध्ये २२ व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली. अखेर २०१८ मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले.इतकेच नाहीतर पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) हे पद देखील मिळाले.विटा उचलण्याच्या कामापासून ते डीएसपी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.