GSI Recruitment 2022 : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI ने चालक पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया २३ जुलैपासून सुरू झाली असून अर्जाची अंतिम तारीख ४ सप्टेंबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी ऑफलाइन अर्ज सादर करावे लागतील. अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
एकूण जागा : १३
ज्यामध्ये 8 पदे अनारक्षित आहेत. एक पद SC, 3 OBC आणि 1 पद EWS साठी राखीव आहे.
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण असलेले हलके मोटार आणि अवजड मोटार वाहन परवाना असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारास मान्यताप्राप्त संस्थेत ट्रक, जीप किंवा ट्रॅक्टर चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव असावा.
वय श्रेणी :
कमाल वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत असावी.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना ₹19900 ते ₹63200 प्रति महिना मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
वाहन चालवण्याची परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अर्ज कसा करायचा :
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि नोंदणीकृत पोस्टाद्वारे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ‘संचालक आणि कार्यालय प्रमुख, कक्ष क्र. 304, तिसरा मजला, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, उत्तर प्रदेश, सेक्टर-ई, अलीगंज, लखनौ-226024’
अधिकृत संकेतस्थळ : gsi.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा