⁠
AnnouncementJobs

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार जागांच्या भरती प्रक्रियेची गृहमंत्र्यांकडून ‘तारीख’ जाहीर, पोरं खुश

राज्यातील अनेक तरुण तरुणी पोलीस भरतीची वाट पाहतायत. अशा तरुणांसाठी आता एक खुशखबर आहे. कारण मागील काही काळापासून महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगा भरती होणार असल्याचे अनेकवेळा ऐकण्यात आले. परंतु राज्य सरकारकडून तारखा मात्र जाहीर (Dates For The Recruitment Process) करण्यात येत नव्हत्या. परंतु आता या सगळ्याला गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटलांनी पूर्णविराम लावलाय. जूनच्या 15 तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पोलिस दलातील रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येतील, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी केली. १५ हजार जागांसाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर भरती (Police Recruitment In Maharashtra) प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलिस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलिस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भरती प्रक्रियेची तारीख जाहीर केल्याने पोलिस दलातील सेवेसाठी इच्छुक तरुणांचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘राज्यात १५ जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. गृह विभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे; तसेच सात हजारांच्या भरती प्रक्रियेला १५ जूनपासून सुरुवात होईल. पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी १५ हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक असून, मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे,’ असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button