ISRO Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी इस्रोमध्ये मोठी संधी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) ने विविध पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल आहे. इच्छुक उमेदवार www.nrsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी होणार भरती?
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), रिसर्च सायंटिस्ट (RS), प्रोजेक्ट असोसिएट-I आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट-I च्या 34 जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून उमेदवारांनी संबंधित विषयात BE/B.Tech/B.Sc/M.Sc केलेले असावे. याशिवाय, याशी संबंधित सर्व माहिती अधिसूचनेमधून देखील तपासली जाऊ शकते.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड CBT/मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
इस्रोमध्ये निवड झाल्यावर पगार मिळेल
या पदांवर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल, त्यांना 56000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाऊ शकते.
आवश्यक तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 25 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा