ITBP मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर; 10वी, 12वी पाससाठी सुवर्णसंधी..
ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स म्हणजेच आयटीबीपीमध्ये नोकरीच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयटीबीपीमध्ये इन्सपेक्टर ते कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्जप्रकिया १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच recruitment.itbppolice.nic.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे.आयटीबीपीच्या या भरतीमध्ये २० पदांसाठी भरती केली जाणार आहे.
या पदांसाठी होणार भरती?
असिस्टंट सब इन्स्पेक्टर (लॅबोरेटरीज टेक्निशियन), असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (रेडियोग्राफर), असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फिजियोथेरेपिस्ट), हेड कॉन्स्टेबल(सीएसआर असिस्टंट),कॉन्स्टेबल पदासाठी जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता :
१० वी, १२वी, डिप्लोमा, केंद्रीय नसबंदी कक्ष सहाय्यक मध्ये प्रमाणपत्र. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे असावे. तसेच नियमानुसार वयात सवलत मिळेल.
परीक्षा फी : १००/- रुपये
पगार : २१,७००/- ते ९२,३००/- रुपये
अधिकृत संकेतस्थळ : recruitment.itbppolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा