⁠  ⁠

कोकण रेल्वेत परीक्षा न देता नोकरीची संधी.. 73000 पगार मिळणार

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (kokan Railway Recruitment 2022) ने सहाय्यक प्रकल्प अभियंता आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार KRCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 7 फेब्रुवारी 2022 रोजी वॉक-इन-मुलाखत घेण्यात येईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 14 पदे भरली जातील.

जागा तपशील

१) सहाय्यक प्रकल्प अभियंता (फॅब्रिकेशन): ४ पदे
२) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (फॅब्रिकेशन): 10 पदे

शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान ५५% गुणांसह पदवीधर असावे.

वयोमर्यादा

सहाय्यक प्रकल्प अभियंता (फॅब्रिकेशन) साठी वयोमर्यादा 45 वर्षे आहे तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (फॅब्रिकेशन) साठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

वॉक-इन-मुलाखत तारीख – 7 फेब्रुवारी

उमेदवारांच्या अर्जांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. उमेदवारांनी आपल्या खर्चाने किमान दोन दिवस राहण्याच्या तयारीने यायचं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला https://konkanrailway.com/येथे भेट देऊ शकता.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Share This Article