Krushi Bharti 2023 : कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. एकूण ७५९ पदे भरण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना (Krushi Recruitment 2023) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
रिक्त पदांचा तपशील :
1) औरंगाबाद 69
2) पुणे 112
3) ठाणे 79
4) नाशिक 96
5) कोल्हापूर 82
6) नागपूर 113
7) अमरावती 109
8) लातूर 99
शैक्षणिक पात्रता:
महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात कृषी सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी 05 वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.
परीक्षा फी : 650/- रुपये.
पगार : 35,400/- रुपये ते 1,124,00/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
परीक्षेचा अभ्यासक्रम व योजना :-
सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. २८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील: सामान्य विषय (पेपर-1) व कृषि विभागाचे विषय (पेपर-2).
प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे 100 प्रश्न आणि तितकेच गुण आणि 90 मिनिटांचा कालावधी असेल.
निवडीचे निकष :
कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.१३-अ, दि. 4 मे, 2022 मधील तरतुदीनुसार राहील.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा