महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही खास बातमी आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात भरती निघाली आहे. कृषी सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे.
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. तर या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल मुलाखत १८ डिसेंबरला घेतली जाणार आहे. कृषी सहाय्यक पदाची भरती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : बी.एससी मध्ये दोन पदवी प्राप्त केलेली असावी.तसेच उमेदवारांना शेतीतील कीड आणि रोगांचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, रायगड येथे ही भरती होणार आहे.या नोकरीसाठी अर्जाचा तपशील तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल. हा अर्ज भरुन प्रधान अन्वेषक आणि किटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र रायगड येथे पाठवायचा आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.मुलाखतीच्या वेळी तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. उमेदवारांची मुलाख १८ डिसेंबरला घेतली जाणार आहे.