Krushi Vibhag Pune Bharti 2023 कृषि विभाग पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 18
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 13
शैक्षणिक पात्रता : 1) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी.02) व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
2) सहायक अधीक्षक (गट- क) / Assistant Superintendent 05
शैक्षणिक पात्रता : 01) सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. 02) पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. 03) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
SSC CGL : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’तर्फे नवीन मेगाभरती ; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी, (मागासवर्गीय – 45 वर्षापर्यंत)
वरिष्ठ लिपिक – 18 ते 40 वर्षे
सहायक अधीक्षक (गट- क) – 40 वर्षापर्यंत
परीक्षा फी :
मागास – 720/- रुपये
मागास / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/- रुपये
इतका पगार मिळेल
वरिष्ठ लिपिक – 25,500- 81,100/- रुपये आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहायक अधीक्षक (गट- क) – 35,400 – 1,12,400 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
निवड प्रक्रिया:-
जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल : :-
कृषी व सहकार विभाग, सहाय्यक अधीक्षक (सेवा प्रवेश नियम), १९७८
कृषी व सहकार विभाग, वरिष्ठ लिपिक (सेवा प्रवेश नियम), १९७८
निवडीची पद्धत :-
सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. I
संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील जाहिरातीमध्ये पाहू शकतात.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा