---Advertisement---

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे भरती २०२१

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विधी अधिकारी गट अ पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. ०२) ” विधि अधिकारी, गट-अ ” पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषय, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

वयो मर्यादा : ६२ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०९ सप्टेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahapolice.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.